आमदार मुनगंटीवारांचे ‘ते’ पत्र, अन् चिमुकलीवर सुरू झाले ब्रीज कॅन्डीत उपचार...

दुर्योधन कुटुंबीय विवंचनेत असताना भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ही माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयाच्या संचालकांना पत्र पाठवले.
आमदार मुनगंटीवारांचे ‘ते’ पत्र, अन् चिमुकलीवर सुरू झाले ब्रीज कॅन्डीत उपचार...

Sudhir Mungantiwar and Kritika Duryodhan

Sarkarnama

नागपूर : चंद्रपूर येथील (Chandrapur) किशोर दुर्योधन यांची मुलगी कृतिका लिवरच्या आजाराने ग्रस्त होती. तिचे पालक उपचारासाठी नागपूरला घेऊन गेले असता डॉक्टरांनी उपचारासाठी ७ लाख रुपयांचा खर्च सांगितला. हा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा होता, येवढा पैसा कोठून आणणार, या विवंचनेत असताना बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी पुढाकार घेऊन दुर्योधन कुटुंबीयांना आधार दिला.

गेल्या काही महिन्यांपासून कृतिका लिवरच्या दुर्धर आजाराने ग्रस्त होती आणि उपचारासाठी पैसे नसल्याने तिचे आईवडील हतबल झाले होते. येवढा पैसा मिळणार नाही आणि दिवसागणिक तिच्या वेदना वाढत होत्या. आता आपण मुलीला गमावणार, या विचारानेच ते व्याकूळ व्हायचे. दुर्योधन कुटुंबीय विवंचनेत असताना भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयाच्या संचालकांना पत्र पाठवले आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० मधील कलम ४१क क (१) अन्वये १० टक्के निर्धन रुग्ण योजनेअंतर्गत कृतिकावर उपचार करण्याची विनंती केली. रुग्णालय प्रशासनानेही त्वरित हालचाल करीत कृतिकाला उपचारासाठी दाखल करून घेतले आणि तिच्यावर उपचार सुरू केले.

दुर्योधन कुटुंब आर्थिकदृष्ट्य़ा अतिशय कमजोर असल्यामुळे कृतिकावर उपचार करणे अशक्य झाले होते. नैराश्याने अस्वस्थ झाले होते. उपचाराअभावी तिला असह्य वेदना सुरू झाल्या. या वेदना बघून तिच्या कुटुंबाने यावर काही मार्ग काढावा, या आशेने अनेकांना मदतीसाठी विनंती केली. मात्र कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कुणाकडून मदत घेतल्याशिवाय तिच्या उपचाराला दुसरा पर्याय नव्हता. शेवटी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व उपाध्यक्ष मोहित डंगोरे यांच्याकडे त्यांनी कृतिकाच्या उपचाराविषयी काही मदत मिळेल का, अशी विचारणा केली. आशिष देवतळे व मोहित डंगोरे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांना सदर विषय सांगितला. संवेदनशील नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही बाब ताबडतोब मार्गी लावण्यासाठी त्यांचे वैद्यकीय साहाय्यक सागर खडसे यांना सूचना केली व धर्मादाय आयुक्तांना पत्राद्वारे सदर रुग्णाला शासकीय योजनेखाली मोफत इलाज मिळावा, यासाठी विनंती केली. सागर खडसे यांनी रुग्णासोबत मुंबई गाठली आणि ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

<div class="paragraphs"><p>Sudhir Mungantiwar and Kritika Duryodhan</p></div>
आमदार मुनगंटीवार म्हणाले, नाना पटोलेंनी चांगल्या संस्कारांचा सन्मान करावा...

ब्रीच कँडी हॉस्पिटलचे संचालक व विश्वस्तांना आमदार मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे केलेली विनंती आणि महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० मधील कलम ४१क क (१) अन्वये १० टक्के (निर्धन रुग्ण) मोफत इलाज करण्यासाठी धाडलेल्या पत्राची दखल घेत ७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले. कुठलीही अनामत रक्कम न घेता आयपीएफमधून त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले गेले. कृतिकाला योग्य उपचार मिळण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार धावून आले. या उपचारामुळे आमच्या लेकीला निरोगी आयुष्य जगता येईल. यापेक्षा मोठा आनंद या जगात आमच्यासाठी दुसरा नाही, अशा भावना व्यक्त करीत दुर्योधन कुटुंबीयांनी आमदार मुनगंटीवार यांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in