आमदार मुनगंटीवार म्हणाले, देव करो अन् त्यांना पुढचे चिन्ह खंजीरच मिळो…

सतत गुंडांची पार्टी, डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडर बरा, भाजप जिंकली पण विजयी झाली नाही. झाल्या प्रकारातून त्यांनी अद्यापही धडा घेतलेला दिसत नाहीये, असे आमदार सुधीर मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) म्हणाले.
Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar and Uddhav ThackeraySarkarnama

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत सध्या चांगलीच गाजतेय. या मुलाखतीवर भाजप नेत्यांकडून आज दिवसभर प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे.

संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) घेतलेली मुलाखत म्हणजे फिक्स्ड मॅच आहे आणि फिक्स्ड मॅच मी बघत नाही, तर लाईव्ह मॅच बघतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले. रावसाहेब दानवे म्हणाले की, वंदनीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakeray) महाराष्ट्राचे राजा होते. आम्ही त्यांना मानतो. पण राजाच्या पोटी राजा जन्माला येत नाही. राजा पोटातून नाही तर पेटीतून जन्माला येतो. याशिवायही भाजपच्या इतर नेत्यांनी या मुलाखतीवर तोंडसुख घेतले आहे.

खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपाचा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपने नेहमीच आपल्या मित्र पक्षाची काळजी घेतली, त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी ते आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनीच मित्रपक्षांना मदत केली आहे.

उद्धव ठाकरे यांना मदत केली तेव्हा भाजप चांगला होता. आता त्यांच्या पायाखालील वाळू सरकल्याने भाजप त्यांना वाईट दिसत आहे, असे सांगत खासदार संजय राऊत यांच्या जाळ्यात अडकू नका, असा सल्ला आमदार बावनकुळेंनी ठाकरेंना दिला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने अठरा महिने विधिमंडळात, मंत्रालयात नव्हते. आता असा कुठला डॉक्टर मिळाला की मास्कशिवाय फिरत आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणुका घेण्याच्या आव्हानावरही बावनकुळे यांनी टिका केली. राष्ट्रवादी-कॉंग्रेससोबत गेले, तेव्हा का नाही निवडणूक घेण्याचे सुचले. निवडणुकीत जनतेला सामोरे जायला हवे होते, त्यानंतर राष्ट्रवादी-कॉंग्रेससोबत जायचे होते, असेही बावनकुळे म्हणाले.

Sudhir Mungantiwar and Uddhav Thackeray
लोकांचे हाल बघून आमदार मुनगंटीवार वेकोलिच्या महाप्रबंधकावर बरसले, म्हणाले...

यामध्ये आणखी एक प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, ते लोक काय सतत बोलताहेत काही कळायला मार्ग नाही. सतत गुंडांची पार्टी, डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडर बरा, भाजप जिंकली पण विजयी झाली नाही. झाल्या प्रकारातून त्यांनी अद्यापही धडा घेतलेला दिसत नाहीये. रोजच्या रोज त्यांची माणसं त्यांना सोडून जात आहेत. पण आजही ते आपली चूक मान्य करायला तयार नाहीत. दररोज ‘आमच्या पाठीत खंजीर खुपसला’, येवढं एक वाक्य ते बोलतात. देव करो, अन् त्यांना पुढचं बोध चिन्ह खंजीरच मिळो. उद्धव ठाकरे यांच्या हातून आता ‘धनुष्यबाण’सुद्धा निश्‍चितपणे जाणार, असे तर आमदार मुनगंटीवारांना सांगायचे नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com