आमदार मिटकरींवर कमिशनखोरीनंतर घासलेट चोरीचा आरोप, युवक जिल्हाध्यक्ष देणार पुरावे !

आमदार मिटकरी (Amol Mitkari) हे घासलेट चोर असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी केली. यासह त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप शिवा मोहोड यांनी केले आहेत.
Amol MItkari and Shiva Mohod
Amol MItkari and Shiva MohodSarkarnama

अकोला : अकोल्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सध्या नेत्यांमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप करण्याची मालिका सुरू आहे. आमदार मिटकरी हे घासलेट चोर असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी केली. यासह त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप शिवा मोहोड यांनी केले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) युवक आघाडीचे शिवा मोहोड यांनी कमिशनखोरीचा आरोप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर आरोप केला होता. अकोला (Akola) जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पक्षाच्या आढावा बैठकीत हा प्रकार समोर आला, या आरोपांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, अखेर याप्रकरणी आमदार अमोल मिटकरींनी हे सारे आरोप फेटाळले. दरम्यान आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं, असा पलटवार आमदार मिटकरींनी केला होता. दरम्यान आता यावर शिवा मोहोड यांनी प्रत्युत्तर दिले, मिटकरी हे घासलेट चोर आहेत, त्यांच्या घरी घासलेटचं लायसन होतं आणि त्यातून ते घासलेटच चोरी करत असल्याचा आरोप शिवा मोहोड यांनी केला आहे. याशिवाय इतरही आरोप मोहोड यांनी आमदार मिटकरींवर केले आहेत.

आमदार साहेब घासलेट चोर होते. कारण त्यांच्या घरी घासलेट'चं लायसन होतं, ते घासलेट त्याच्यातलं काढून ते चोरून विकत होते. हे सगळया गावाला माहीत आहे, पण पक्षाची आचारसंहिता असते, त्यामुळे मी काही बोलू शकत नाहीये. पण माझ्या चरित्रावरच संशय निर्माण करणाऱ्या या माणसाला मी आव्हान देतो की जर माझे चरित्र्य खराब असल्याचा एक जरी पुरावा दिला, तर भर चौकात फाशी घेईल. नाही तर यांनी यांचं अकोला जिल्ह्यातील पातूरच्या महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे? एका काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला दहा लाख रुपये कशासाठी दिले? एका पुण्याच्या महिला पदाधिकाऱ्यासोबत रेस्ट हाऊसवर अकोल्यात तीन दिवस मुक्कामी कशासाठी होते, या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी.

Amol MItkari and Shiva Mohod
अमोल मिटकरी निधीसाठी कमिशन घेतात, पदाधिकाऱ्यांची जयंत पाटलांकडे तक्रार...

यासोबतच मिटकरी हे कमिशन घेत नसतील तर मग अकोल्याच्या या केशवनगरमध्ये सर्वात उच्चभ्रू वस्तीत ८० लाख रुपयांचा प्लॉट कसा काय घेतला? त्यासोबतच ते अकोल्यात फिरताना त्यांच्यासोबत जी चारचाकी गाडी असते, ती ३० लाखांची गाडी आहे. ती कुठून आली? या माणसाला माझं आव्हान आहे की माझ्याबद्दल चरित्रावर संशय घेत आहे, ते यांनी एकदा पुराव्यासहित जाहीर करावं. अन्यथा दहा दिवसानंतर पुराव्यासह मिटकरींच्याच घरासमोर पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप जाहीर करणार असेही मोहोड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in