Tukaram Mundhe News : आमदार खोपडेंचे मुख्य सचिवांना पत्र; तुकाराम मुंढेंवर गुन्हा दाखल होणार ?

Krishna Khopde : आमदार कृष्णा खोपडे यांनी कारवाईसाठी फास आवळण्यास सुरुवात केली आहे.
Tukaram Mundhe
Tukaram MundheSarkarnama

Nagpur Political News : कृषी विभागाचे सचिव आणि रोखठोक भूमिकेमुळे आणि वारंवार बदलीमुळे नेहमी चर्चेत असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी कारवाईसाठी फास आवळण्यास सुरुवात केली आहे. नागपूर स्मार्ट सिटीतील गैरव्यवहाराबाबत मुंढे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. (He has sent a letter to the Chief Secretary to file a case)

आमदार खोपडेंच्या पत्रामुळे तुकाराम मुंढे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेत आयुक्त असताना मुंढे यांनी नागपूर स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचीही सूत्रे हाती घेतली होती. स्मार्ट सिटीत त्यांनी २० कोटी रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन महापौर संदीप जोशी तसेच तत्कालीन पदाधिकारी संदीप जाधव यांनी सदर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

एवढेच नव्हे महिला अधिकाऱ्यांसोबत अभद्र व्यवहार प्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. परंतु पोलिस विभागाने यावर काहीही कारवाई न करता केवळ राज्य सरकारकडून (State Government) मार्गदर्शन मागण्याचेच काम केल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात केला आहे.

आमदार खोपडे यांनी २३ ऑगस्टला मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात मुंढे यांच्यावर २० कोटींचा गैरव्यवहार व महिला अधिकाऱ्यांसोबत अभद्र व्यवहाराबाबत तत्काळ प्रभावाने कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe IAS : 18 वर्षात 22 वेळा बदल्यांचा विक्रम ; कोण आहेत IAS तुकाराम मुंढे

मुंढे यांच्यावर कारवाईबाबत महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) काळात अनेकदा पोलिस (Police) आयुक्तांना पत्र दिले. परंतु महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या दडपणामुळे मुंढे यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे.

नुकताच राज्य माहिती आयोगाने तुकाराम मुंढेविरुद्ध (Tukaram Mundhe) दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी तीन वर्षांचा विलंब का झाला? याला जबाबदार कोण? अशी विचारणा मुख्य सचिव व गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिवांना विचारला. त्यामुळे या प्रकरणात मुंढे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आमदार खोपडे यांनी केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in