बंडखोर एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचे आमदार जोरगेवारांनी सांगितले ‘हे’ कारण...

...म्हणून बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी सांगितले.
MLA Kishor Jorgewar with Eknath Shinde and other MLAs.
MLA Kishor Jorgewar with Eknath Shinde and other MLAs.Sarkarnama

नागपूर : ज्या मायबाप जनतेने विश्‍वास ठेवून विक्रमी मतांनी निवडून दिले, त्या जनतेची कामे करण्यासाठी सत्ता असणे गरजेचे आहे. गेली अडीच वर्षे सत्तापक्षाच्या सोबत होतो म्हणून मतदारसंघासाठी कामे करू शकलो. यापुढेही विकास करायचा असेल, तर सत्तेसोबत राहणे गरजेचे आहे. म्हणून बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असे चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.

मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारसोबत (Mahavikas Aghadi Government) राहून मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करवून घेता आला. याच दरम्यान घुग्घुस नगर परिषद निर्मितीचा प्रलंबित विषय मार्गी लागला. सत्तेसोबत असल्यामुळे अपक्ष असुनसुध्दा 287 कोटी रुपयांची व्याघ्र सफारी, तीर्थक्षेत्र वढा येथील विकासासाठी 44 कोटी रुपये, बाबुपेठ उड्डाणपुलासाठी उर्वरित निधीला मंजुरी, मनपा हद्दवाढीच्या दिशेने प्रयत्न प्रलंबित असलेल्या घुग्घुस रेल्वे उड्डाणपुलासाठी 60 कोटी रुपये, अशी अनेक कामे मार्गी लावू शकलो. त्यामुळे पुढेही चंद्रपूर (Chandrapur) विधानसभा मतदार संघाचा सर्वसमावेशक विकास करायचा असेल, तर सत्तेसोबत राहणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी दिली.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, गुरुवारी सायंकाळी सर्व बाजू तपासून आणि मतदार संघातील नागरिकांशी चर्चा करुन मी एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेत असताना चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासह येथील प्रलंबित मागण्या पूर्ण करणे हा एकमात्र उद्देश होता. साधारणतः: मतदार संघातील कामे करण्यासाठी अपक्ष हा सत्तेबरोबर राहत असतो. मागील अडीच वर्षात सत्तेसोबत असल्यामुळे कोरोना काळातही मतदार संघातील विकासासाठी आपण मोठा निधी खेचून आणला.

MLA Kishor Jorgewar with Eknath Shinde and other MLAs.
''हॅलो.. मी एकनाथ शिंदे बोलतोय'': अखेर कॉल केलाच...

विकासाचा हा झंजावात पुढेही सुरू ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा गट सत्तेत येणार हे लक्षात घेऊन मी त्यांच्या गटाला समर्थन दिले आहे. हे समर्थन कोणत्या गटला नसून चंद्रपूरच्या विकासासाठी सत्तेत येणा-याला असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे. विकासाच्या या मुद्यावर चंद्रपूरची जनता माझ्या सोबत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारसोबत काम करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इतर सहकाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभले. त्यामुळे त्यांचा आदर हा नेहमीच राहील. असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com