आमदार जोरगेवार संतापले अन् म्हणाले, अध्यक्ष महोदय त्यांना जरा सांगा...

अशाने कसं होणार, अध्यक्ष महोदय त्यांना जरा सांगा...’ ,अशा शब्दांत आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी सभागृहात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बोलताना संताप व्यक्त केला.
Kishor Jorgewar and Nitin Raut
Kishor Jorgewar and Nitin RautSarkarnama

नागपूर : ‘तुमच्या विभागाचा इतका मोठा प्रकल्प आम्ही आमच्या जिल्ह्यात चालवतो. आम्ही वीज उत्पादन करून तुम्हाला पैसे कमवण्याची संधी देतो. मात्र आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे तुम्ही लक्ष देत नाही. अशाने कसं होणार, अध्यक्ष महोदय त्यांना जरा सांगा...’ ,अशा शब्दांत आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी सभागृहात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बोलताना संताप व्यक्त केला.

ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत (Nitin Raut) हे आमच्या प्रश्नांकडे लक्षच देत नाहीत, असे म्हणत आमदार जोरगेवार आज सभागृहात संतापले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. आज चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्ताचा विषय राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी लक्षवेधीमध्ये उपस्थित केला. या लक्षवेधीवर बोलताना चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत येथील प्रकल्पग्रस्तांबाबत सरकारने (Maharashtra Government) आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या प्रश्नावर बोलण्यासाठी अधिकचा वेळ देत चंद्रपुरातील (Chandrapur) सर्व लोकप्रतिनिधींना सदर विषयावर बोलण्याची संधी देण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अध्यक्षांना केली. त्यानंतर भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सदर विषयावर बोलत प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सभागृहात मांडला.

चंद्रपूर थर्मल महाऔष्णिक विद्युत केंद्रांमध्ये प्रकल्प सुरू होऊन ४० वर्षे झाल्यानंतरही सीएसटीपीएसच्या आस्थापना विभागात कार्यरत असलेले अधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या नावावर गैरप्रकल्पग्रस्तांची प्रशिक्षणार्थी म्हणून भरती करीत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० वर्ष उलटनूही ९९० प्रकल्पग्रस्तांना अद्यापही नोकऱ्या-या दिल्या गेलेल्या नाहीत. सीएसटीपीएसने नोटीस बोर्डवर लावलेल्या १२८ जणांच्या यादीत त्रुट्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे का? आणि उर्वरित प्रकल्पग्रस्तांबाबत प्रशासनाचे धोरण काय ? त्यांना कधी नोकरी देणार आहात? हे स्पष्ट करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

Kishor Jorgewar and Nitin Raut
आमदार जोरगेवार म्हणतात, ‘त्या’ १२० आजारांवरील शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करा...

या थर्मल विद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास ३००० मेगावॉट विजेचे उत्पादन करत असताना आम्हाला प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या आमच्या शेतकऱ्यांना येथे नोकऱ्या-या मिळत नाहीत. आम्ही केवळ प्रदूषण सहन करायचे का, असा प्रश्नही यावेळी आमदार जोरगेवार यांनी उपस्थितीत केला. यावर उत्तर देताना राज्य ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी १२८ उमेदवारांच्या तात्पुरता यादीस अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही. सदर यादीची पडताळणी करण्याची कार्यवाही महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती दिली.

विशेष म्हणजे नोकरीच्या मागणीसाठी सीएसटीपीएसच्या चिमणीवर चढलेल्या प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीद्वारे बोलणे करून दिले होते, हा विषय सुटावा व प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू असून तसा पाठपुरावाही शासन स्तरावर आमदार किशोर जोरगेवार करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in