Jaiswal: आमदार जयस्वाल म्हणाले, वेकोलिचा मुद्दा अजित पवारांनीही सभागृहात उपस्थित केला

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) आमदार सुनील केदार, नितीन राऊत आणि कृषिमंत्र्यांच्या बैठकीतही हा विषय मांडला. पण पाहिजे तसा तोडगा निघाला नाही.
Ajit Pawar, Ashish Jaiswal and Nitin Gadkari
Ajit Pawar, Ashish Jaiswal and Nitin GadkariSarkarnama

नागपूर : अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु वेकोलि (वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड) च्या मातीच्या ओव्हरबर्डनमुळे नैसर्गिक नाले पूर्णपणे बंद झाले आहेत. काही नाले चुकीच्या पद्धतीने वळवण्यात आले तर काही नाले वळविलेच गेले नाही. परिणामी दरवर्षी शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती पाण्याखाली बुडते आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते, असे रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल म्हणाले.

आम्ही वारंवार वेगवेगळ्या व्यासपीठांवर हा विषय मांडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) आमदार सुनील केदार, (Sunil Kedar) नितीन राऊत आणि कृषिमंत्र्यांच्या (Abdul Sattar) बैठकीतही हा विषय मांडला. पण पाहिजे तसा तोडगा निघाला नाही. आता आम्ही नव्याने ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नुकसानग्रस्त भागाचा व्हिडिओ तयार करून आणला आणि कृषी खात्याचा नव्याने पदभार घेतलेले अब्दुल सत्तार यांना तो दाखवला. वेकोलिचे सीएमडी आणि विभागीय आयुक्तांच्या समोर तो विषय उपस्थित केल्याचेही आमदार जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले.

६५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला नाही आणि तरीही शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आता वेकोलि हात वर करत आहे आणि सरकारसुद्धा हात वर करत आहे. मोठा गंभीर प्रश्‍न आता शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. वराडा गावातील सर्व शेतकरी त्रस्त झाले आहेत. दरवर्षी या शेतकऱ्यांची शेती पाण्यात बुडते. हे शेतकरी लढा देत आहेत, पण त्यांना यश आले नाही. शेतकऱ्यांची काहीही चूक नसताना त्यांना यातना भोगाव्या लागत आहेत. वेकोलिच्या मातीच्या ओव्हरबर्डनमुळे बुजलेल्या नाल्यांचे काम आधी करणे गरजेचे आहे.

नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना वेकोलिने भरपाई द्यावी, अशी आमची भूमिका आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही जबाबदारी विभागीय आयुक्तांना दिलेली आहे. त्याचा आम्ही पाठपुरावा करू. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. सरकारकडून जे पंचनामे सध्या केले जात आहे. त्याची यादी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दाखवावी, अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. कारण सर्व काही झाल्यावर लोक आमच्याकडे येतात आणि सांगतात की आमचं नाव सुटलं, असं होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीमध्ये ती यादी तपासली जाईल, असे आमदार जयस्वाल यांनी सांगितले.

Ajit Pawar, Ashish Jaiswal and Nitin Gadkari
अनंत गुढे म्हणाले, आशिष जयस्वाल हा प्रामाणिक व कट्टर शिवसैनिक, मंत्रिपद मिळेल...

शेतांसोबतच घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे अन्न, धान्यासहित वस्तू वाहून गेल्या नाहीतर त्या सडल्या. हा मुद्दा मी विधानसभेत उचलून धरला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही वेकोलिमुळे होणाऱ्या नुकसानाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आहे. एका ज्येष्ठ नेत्यानं वेकोलिचा मुद्दा उपस्थित करण्याची बहुधा ही पहिली वेळ असावी. त्याचे अजित पवारांना हा मुद्दा उचलला, याचा आनंद आहे. पण शेतकऱ्यांना भरपाई मिळेपर्यंत आमचे समाधान होणार नाही, असे आमदार जयस्वाल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com