मंत्री मुनगंटीवारांकडून आमदार डॉ. फुकेंच्या मागण्या पूर्ण; मच्छिमार व्यापाऱ्यांना मोठा दिलासा

मुंबई मंत्रालयात सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आमदार डॉ.परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांच्या उपस्थितीत काल मच्छिमार संघटना, प्रशासकीय अधिकारी, पूर्व विदर्भातील मत्स्य व्यवसायिक तसेच गोड्या पाण्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्था यांची बैठक घेतली.
Sudhir Mungantiwar, Dr. Parinay Fuke and others.
Sudhir Mungantiwar, Dr. Parinay Fuke and others.Sarkarnama

नागपूर : गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या मुंबई अधिवेशनादरम्यान भंडारा-गोंदिया विधानपरिषद क्षेत्राचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी सभागृहात शासनाचे लक्ष वेधून गोड्या पाण्यातील मासळी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. या संदर्भात राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक पाऊल उचलत ३१ ऑक्टोबरपर्यंत तलावाची लीज वसूल करू नये, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते, तसेच आमदार फुके यांच्या सर्व प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत हा विषय मंत्रिमंडळात ठेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी काल त्या सर्व मागण्या मान्य केल्या.

मुंबई (Mumbai) मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आमदार डॉ.परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांच्या उपस्थितीत काल मच्छिमार संघटना, प्रशासकीय अधिकारी, पूर्व विदर्भातील (Vidarbha) मत्स्य व्यवसायिक तसेच गोड्या पाण्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्था यांची बैठक घेतली. या बैठकीत मत्स्य संस्थेला मोठा दिलासा देत आमदार फुके यांनी उपस्थित केलेले सर्व प्रश्न मार्गी लावले. बैठकीत मत्स्यव्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय करण्याच्या कायद्याला मान्यता देणे, मत्स्यव्यवसाय कल्याण विकास मंडळासाठी १०० कोटींची व्यवस्था आणि जिल्हा मत्स्य व्यवसाय संघांसाठी प्रशासकीय/प्रशासकीय खर्चास मान्यता देणे.

प्रति संस्था १० लाख अनुदान देणे, मत्स्यबीज काढणीसाठी संस्थेला ५० कोटींचे पॅकेज देणे, गोड्या पाण्याची योजना तातडीने सुरू करणे, कोरोना संकटात २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत या दोन वर्षांसाठी तलावाचा संपूर्ण करार (लीज) माफ करणे. मासेमारी व्यवसायात येणाऱ्या समस्यां, तसेच अडथळे दूर करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करणे, वनक्षेत्रातील बंद तलावांमध्ये मासेमारी पुन्हा सुरू करणे, उपाययोजना राबविणे, ग्राम विकास खात्याकडे जिल्हा परिषदेच्या सर्व तलावांना ३ जुलै २०१९ चा निर्णय लागू करणे आदि सर्व मागण्यांवर मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक निर्णय घेत त्या मान्य करत या प्रकरणाची कागदोपत्री कार्यवाही लवकर पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

Sudhir Mungantiwar, Dr. Parinay Fuke and others.
Parinay Fuke : आमदार परिणय फुके म्हणाले, त्या दिवसांत मी तेथील भयावह स्थिती बघितली…

बैठकीत प्रधान सचिव पराग जैन, मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, बंडु हजारे, वासुदेव हुरसुकले, भिमराव कावणपुरे, अमोल बावणे, राजहंस ढोके, सोमनाथ जमधडे, इतर अधिकारी, मच्छीमार संघटनेचे पदाधिकारी आदि उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com