Sarkarnama Impact : आमदार डॉ. फुके म्हणाले, आजच्या आज सर्व आरोपींना अटक करा!

आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी सर्व आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे.
Dr. Parinay Fuke
Dr. Parinay FukeSarkarnama

भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्यावर वाळू तस्करांनी का जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणातील सर्व आरोपींना आजच्या आज अटक करण्याच्या सूचना भंडारा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांना भंडारा-गोंदिया (Gondia) जिल्ह्याचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिले.

आमदार डॉ. फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी ‘सरकारनामा’च्या बातमीची तत्काळ दखल घेतली. यासंदर्भात ‘सरकारनामा’शी बोलताना ते म्हणाले, वाळू तस्करांवर कारवाई करणे म्हणजे अधिकाऱ्यांच्या जिवाला धोका झाला आहे. आता यापुढे असे होता कामा नये. तहसीलदारांवर झालेल्या हल्ला प्रकरणात टिप्पर चालकाला अटक केली असली तरी यातील सर्व आरोपींना आजच्या आज अटक झाली पाहिजे. तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास यापुढे अधिकारी अशा कारवाया करण्यास धजावणार नाहीत. त्यामुळे पोलिसांनी (Police) आजच्या आज सर्व आरोपींना अटक करावी. आता भंडारा (Bhandara) पोलिस त्या कामी लागल्याने सर्व आरोपींना आजच्या आज अटक होण्याची शक्यता आहे.

या हल्ल्यातील मुख्य सूत्रधारालाही आज अटक होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार या सर्व आरोपींवर मोक्का लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेले मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांच्यावर वाळू तस्करांनी काल जीवघेणा हल्ला केला होता. वाळू तस्करापासून जीव वाचविण्यासाठी तहसीलदार कारंडे यांनी आपल्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केला. वाळू तस्करांद्वारे जेसीबीच्या पंजाने जीवे मारण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच तहसीलदारांनी दोन राऊंड हवेत फायर केले होते.

त्यानंतर तहसीलदार कारंडे यांनी मोहाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर लगेच जेसीबी व टिप्पर चालक, मालक यांच्या विरुद्ध मोहाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जेसीबी चालकाला अटक केली आहे. काल दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास मोहाडीचे तहसीलदार दीपक कारंडे यांना रोहा या गावी तस्करांनी साठवून ठेवलेली वाळू जेसीबीद्वारे टिप्परमध्ये भरून चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांच्या चमूसह रोहा येथे प्रत्यक्षात त्यांनी भेट दिली असता जेसीबीद्वारे टिप्परमध्ये वाळू भरण्याचे काम सुरू होते.दरम्यान तहसीलदारांनी ते काम थांबवून आम्हाला शासकीय कार्यवाही करण्यास मदत करावी, असे आवाहन जेसीबी चालकाला केले. मात्र जेसीबी चालकाने त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने हल्ला चढविला. तहसीलदारांनी त्यातून स्वतःचा बचाव केला. त्यानंतर जेसीबी चालकाने तिथून जेसीबीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तहसीलदारांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला असता जेसीबी चालकाने पुन्हा त्यांच्यावर जेसीबीच्या पंज्याने जीवघेणा हल्ला केला.

Dr. Parinay Fuke
आमदार परिणय फुके संतापले; म्हणाले विद्यार्थ्यांच्या जिवाशी हा काय खेळ चालवलाय ?

तहसीलदारांवरील हल्ल्याच्या प्रकरणात एका मोठ्या नेत्याच्या खासगी संघटनेच्या कार्यकर्त्याचे नाव समोर येत आहे. तोच मुख्य सूत्रधार असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याची बातमी ‘सरकारनामा’वर प्रकाशित झाली होती. आमदार डॉ. परिणय फुके यांनी सर्व आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. त्यामुळे या हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार लवकरच गजाआड होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in