आमदार डॉ. फुकेंनी वेळीच दखल घेतल्याने अडीचशेवर लोकांना मिळणार जमिनीचे पट्टे...

विधानपरिषदेचे भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr.Parinay Fuke) दौऱ्यावर असताना लोकांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली.
MLC Dr. Parinay Fule at Mohadi, Dist. Bhandara.
MLC Dr. Parinay Fule at Mohadi, Dist. Bhandara.Sarkarnama

नागपूर : भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील मोहाडी नगर पंचायत अंतर्गत अतिक्रमण केलेल्या लोकांना जमिनीचे पट्टे देण्याचे काम कित्येक वर्षांपासून रखडले होते. विधानपरिषदेचे भंडारा-गोंदिया (Gondia) जिल्ह्याचे आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr.Parinay Fuke) दौऱ्यावर असताना लोकांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ या मागणीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना हा विषय मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

सन २००१ च्या आधीपासून भूधारकांनी अतिक्रमण केलेले जमिनीचे पट्टे नियमित करून संबंधित लोकांच्या नावे करणे नियमांनुसार आवश्यक होते. यासंदर्भात मोहाडी नगर पंचायतीने २५९ अतिक्रमित पट्टेधारकांची यादी प्रसिद्ध केली होती. यादी काढून नगर पंचायत प्रशासन मोकळे झाले. त्यानंतर एक कागदही नगर पंचायत कार्यालयातून हालला नाही. जमिनीचे पट्टे न मिळाल्यामुळे गरीब पट्टेधारक शासनाच्या आवास योजनेपासून वंचित राहिले आहेत.

परिस्थिती गंभीर होत असल्याचे बघून गरजू पट्टेधारकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मोहाडी नगर पंचायत, तहसील कार्यालय व भूमी अभिलेख कार्यालयावर वेळोवेळी आंदोलनही केले. पण त्याचा काही एक फरक निद्रिस्त प्रशासनावर पडला नाही. दरम्यान नुकताच या क्षेत्राचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके दौऱ्यावर होते. तेव्हा लोकांनी ही समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि तसे रीतसर त्यांना निवेदनही दिले.

आमदार फुकेंनी तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना हा विषय निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भोकरे आणि नगर पंचायतीचे अधिकारी वाघाये यांच्या तात्काळ भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. त्यांना विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले. अधिकाऱ्यांना येत असलेल्या अडचणीवर मार्ग सांगितला आणि सदर पट्टे रहिवाशांच्या नावे करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश दिले. आमदारांनी दखल घेतल्यामुळे आता लोकांना त्यांच्या हक्काचे पट्टे लवकरच मिळणार आहेत.

MLC Dr. Parinay Fule at Mohadi, Dist. Bhandara.
फडणीसांनी सांगितला, परिणय फुके पालकमंत्री झाल्यावर पहिल्या दौऱ्याचा 'तो' किस्सा..

यावेळी आमदार डॉ. फुके यांच्यासोबत नगराध्यक्ष छाया डेकाटे, नगरसेविका दिशा निमकर, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अश्विनी कुंभारे, फिरोज कुंभारे, मंगेश पारधी, रामदयाल पराते, राजीव डेकाटे, रामा क्षीरसागर, दिनेश निमकर यांच्यासह पट्टेधारक नागरिक व इतर गावकरी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com