MLC Dr. Parinay Fuke
MLC Dr. Parinay FukeSarkarnama

MLA Fuke : आमदार डॉ. फुके संतापले; म्हणाले, त्या ठेकेदाराकडून वसूल करा पूर्ण रक्कम...

आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) त्यांच्या मतदारसंघात भंडारा (Bhandara) -गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

नागपूर : भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील जांब प्राथमिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे नागरिकांनी याची तक्रार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडे केली. त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची सूचना कार्यकारी अभियंत्यांना केली.

आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) त्यांच्या मतदारसंघात भंडारा (Bhandara) -गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तुमसर तालुक्यातून जात असताना जांब येथे लोक त्यांना भेटले. जांब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतनीकरणाच्या कामात प्रचंड घोळ असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी लगेच आपला ताफा जांबकडे वळवला. तेथे प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. लगेच त्यांनी कार्यकारी अभियंता घरडे यांना कॉल केला आणि जांब प्राथमिक आरोग्य केंद्राचे (PSC) काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करण्याची सूचना दिली.

MLC Dr. Parinay Fuke
Parinay Fuke : आमदार परिणय फुके म्हणाले, त्या दिवसांत मी तेथील भयावह स्थिती बघितली…

८ ते ९ कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम करण्यात आले. या कामातील अर्ध्यापेक्षा जास्त खर्च वाया गेला आहे. जांब प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरक्षा भिंत पाडून नवीन बांधायची होती. पण ठेकेदाराने जुन्याच भिंतीवर प्लास्टर करून त्यावर टाइल्स लावल्या. त्यासुद्धा निकृष्ट (सेकंड) दर्जाच्या आहेत. त्यावर मी कालच तुमसरचा दौरा केला आणि त्या ठेकेदाराला सांगितले की, सुरक्षा भिंतीच्या कामाला हात नाही लावायचा, असे उत्तर कार्यकारी अभियंता घरडे यांनी दिले. पण घरडेंनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेटच दिली नव्हती. तर केवळ सूचना केल्या होत्या. त्यावर ठेकेदाराने एका दिवसातच काम पूर्ण केल्याचे आमदार डॉ. फुकेंनी सांगितले.

कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि संबंधितांनी तात्काळ जांब प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्या आणि कामाची पाहणी करून ठेकेदाराला नोटीस द्या आणि त्याला ब्लॅक लिस्ट करा, असे आमदार फुकेंनी सांगितले. त्याने लावलेल्या टाइल्स एका दिवसातच निघाल्या आहेत. ठेकेदारावर कारवाई करत नसाल तर कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करा, असेही त्यांनी सांगितले. बोगस कामाबद्दल कठोर भूमिका घेतल्यामुळे नागरिकांचे समाधान झाले. आता संबंधित ठेकेदारावर ब्लॅक लिस्ट होण्याची तर कनिष्ठ अभियंत्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com