शिक्षणमंत्री गायकवाडांना आमदार धानोरकर म्हणाल्या, तात्पुरती स्थगिती नको...

चंद्रपूर येथे न्यायाधिकरण कार्यालय सुरू करण्याची मागणी वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.
MLA Pratibha Dhanorkar
MLA Pratibha DhanorkarSarkarnama

चंद्रपूर : पूर्व विदर्भाचे चंद्रपुरातील शाळा न्यायाधिकरण कार्यालय बंद करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर त्याला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मात्र तात्पुरती स्थगिती न देता पूर्ववत कायमस्वरूपी चंद्रपूर येथे न्यायाधिकरण कार्यालय सुरू करण्याची मागणी वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यात सन १९९८ पासून सुरू असलेल्या शाळा न्यायाधिकरणामध्ये चंद्रपूर, (Chandrapur) गडचिरोली, भंडारा, गोंदिया व वर्धा (Wardha) या पाच जिल्ह्यांचा समावेश होता. २० मे २०२२ नुसार शाळा न्यायाधिकरण पुनर्रचना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी अधिसूचना प्रसिद्ध करून चंद्रपूर येथील शाळा न्यायाधिकरण कार्यालय बंद करण्याच्या निर्णय करण्यात आला होता.

अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ अंतर्गत खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्त, बडतर्फ, पदानवत आणि ज्येष्ठता डावलून दिलेल्या पदोन्नतीच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्यासाठी शाळा न्यायाधिकरणाची स्थापना झालेली आहे. महाराष्ट्र राज्य आज रोजी नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, लातूर, सोलापूर, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर येथे शाळा न्यायाधिकरण स्थापित करण्यात आले.

MLA Pratibha Dhanorkar
धानोरकर दाम्पत्याने अखेर जिल्हा बॅंकेची नोकर भरती थांबवलीच...

चंद्रपूर येथील शाळा न्यायाधिकरण ही आस्थापना बंद करून न्यायाधिकरणातील अभिलेख ताब्यात घेऊन ते संबंधित न्यायाधिकरणाकडे वर्ग करणे हा निर्णय चंद्रपूरकरांकरिता अन्यायकारक आहे. सध्या या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. परंतु हा निर्णय कायमस्वरूपी रद्द करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर येथील शिक्षकांच्या नागपूर येथे जाण्यासाठी वेळ व पैशाची मोठी बचत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com