आमदार धानोरकर म्हणाल्या; जिल्हा बॅंकेचा व्यवस्थापक ४२० आहे, चौकशी करा...

चंद्रपूर मध्यवर्ती बॅंकेवर अद्याप प्रशासक नियुक्त झाला नाही, याकडे आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
MLA Pratibha Dhanorkar News
MLA Pratibha Dhanorkar NewsSarkarnama

नागपूर : राज्य शासनाच्या (State Government) सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला १६५ पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली आहे. याआधीची दोन नोकर भरती प्रकरणे वादग्रस्त ठरली आहेत आणि व्यवस्थापक हा ४२०च्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्यामुळे तात्काळ चौकशी समिती गठीत करून बॅंकेवर (Bank) प्रशासक नेमावा, अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आज सभागृहात केली. (MLA Pratibha Dhanorkar News)

आमदार धानोरकर (Pratibha Dhanorkar) म्हणाल्या, चंद्रपूर (Chandrapur) जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. परंतु अद्यापही संचालक मंडळ बरखास्त झाले नाही. त्याउलट दोन वेगवेगळ्या प्रकरणांत ज्याच्यावर ४२०चा गुन्हा दाखल आहे, तो व्यक्ती मुख्य व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून तात्काळ चौकशी करण्याची गरज आहे. सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. या काळात दोन वेळा नोकरी भरती करण्यात आली. ही नोकर भरती वादग्रस्त ठरली. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप भरती प्रक्रियेदरम्यान झाला आहे.

या काळात ही बॅंक अनेक घोटाळ्यांनी गाजली. एका अध्यक्षाला तुरुंगात जावे लागले. ही शेतकऱ्यांची बॅंक आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी काही संचालक आपले हितसंबंध जोपासत आहेत. या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जून २०२१ रोजी दिलेल्या आदेशात कार्यकाळ संपलेल्या बॅंकांवर प्रशासक नियुक्त करून निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. परंतु चंद्रपूर मध्यवर्ती बॅंकेवर अद्याप प्रशासक नियुक्त झाला नाही, याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

MLA Pratibha Dhanorkar News
आता आणखी काय-काय विकणार आहात : आमदार प्रतिभा धानोरकर

सहकार खात्याने १६५ जणांच्या नोकर भरतीला मान्यता देऊन घोटाळ्यांना खतपाणी घालण्याचे काम केले आहे. याशिवाय बॅंकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर यापूर्वीच बॅंकेतील घोटाळा प्रकरणात दोन फौजदारी खटले दाखल आहेत. अशा व्यक्तीला जनरल मॅनेजर या पदावर घेऊ नये, असे रिझर्व बॅंक, नाबार्ड, सहकार विभागाचे निर्देश आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष करून बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाने त्यांना मुदतवाढ दिली. वरील गंभीर बाबी लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हिताची बँक भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी तात्काळ चौकशी समिती गठीत करून प्रशासक नेमण्याची मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लावून धरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com