अमरावतीतील नेते पोलिसी कचाट्यात : आमदार भुयार यांना तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा

पाणीप्रश्नावरून केलेली मारहाण भुयार यांनी भोवली..
Devendra Bhuyar
Devendra BhuyarFacebook

अमरावती : मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना तीन महिने कारावास व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा आज ठोठावण्यात आली. (MLA Devendra Bhuyar gets three months jail)

भुयार यांनी 28 मे 2019 रोजी पाण्याच्या प्रश्नावरून गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्या अंगावर माईक व पाणी बॉटल मारली फेकून मारली होती. तत्कालीन कार्यकारी मुख्य अधिकारी मनिषा खत्री यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला होता. तो न्यायालयात सिद्ध झाल्याने भुयार यांना ही शिक्षा झाली. भुयार हे या शिक्षेला जिल्हा न्यायालयात आव्हान देऊ शकतात. त्यामुळे त्यांना तातडीने शिक्षा होणार नाही. भुयार हे जिल्हा परिषद सदस्य असतानाची ही घटना आहे.

Devendra Bhuyar
Sarkarnama Open Mic Challenge: मोदींची तुलना फक्त नेहरूंशीच: आ. परिणय फुके

अमरावती जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी हे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यातील काहींना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. त्यात आता भुयार यांची भर पडली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यांनाही पोलिस शिपायाच्या मुस्कटात मारल्याबद्दल शिक्षा सुनावली होती. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांच्याविरोधात मुंबईत पोलिस कारवाई सुरू आहे. अमरावतीतील माजी मंत्री आणि भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्याविरुद्धही दंगली भडकविण्याचा गुन्हा काही महिन्यांपूर्वी दाखल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in