महावितरणच्या दाव्यावर आमदार बावनकुळेंनी लावले प्रश्‍नचिन्ह

महानिर्मितीने विक्रमी कामगिरी साध्य केली असून गेल्या ६० वर्षांतील सर्वाधिक वीज निर्मितीचा दावा केला आहे. परंतु हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे म्हणणे आहे.
महावितरणच्या दाव्यावर आमदार बावनकुळेंनी लावले प्रश्‍नचिन्ह
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : राज्याच्या अतिदुर्गम भागांत आजही विजेचा लपंडाव कायम आहे. महावितरण ऐतिहासिक वीज निर्मितीचा केवळ कागदी देखावा करीत असून राज्यातील भारनियमन खरंच संपुष्टात आले असते तर वेळी-अवेळी वीज खंडित होण्याचे प्रकार घडले नसते, असे राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

मागील दोन दिवसांपासून महानिर्मितीने विक्रमी कामगिरी साध्य केली असून गेल्या ६० वर्षांतील सर्वाधिक वीज निर्मितीचा दावा केला आहे. परंतु हा दावा पूर्णतः खोटा असल्याचे आमदार बावनकुळे यांचे म्हणणे आहे. ते कोराडी येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, चंद्रपूर, (Chandrapur) गडचिरोलीसारख्या (Gadchiroli) नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागांत आजही मोठ्या प्रमाणात लोडशेडींग सुरू आहे.

नंदुरबार पालघर आणि मेळघाटसारख्या अतिदुर्गम आदिवासी पाड्यांवरून जनतेचे फोन येत असून भारनियमनाने त्रस्त झालेले शेतकरी वेळी-अवेळी विजेचा लपंडाव कायम असल्याचे सांगत आहेत. भंडारा, गोंदिया भागांत कुठे शेतीला वीज नाही तर कुठे गावात अंधार असल्याची स्थिती आहे. महत्वाचे म्हणजे या स्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पीक वेळीच पाणी न मिळाल्यामुळे धोक्यात सापडले असल्याचे आमदार बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
Video: नागपूरातील पाणी प्रश्नावर भाजप संतप्त; चंद्रशेखर बावनकुळे

मिशन ८ हजार मेगावॅट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महावितरण काम करीत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु त्यासाठी केवळ कागदी विक्रम प्रस्थापित करून चालणार नाही. महावितरणला वास्तविक स्थिती तपासावी लागेल. एकीकडे महावितरणने गेल्या ६० वर्षातील सर्वाधिक वीज निर्मितीचे लक्ष गाठल्याचे जाहीर केले असताना अतिदुर्गम भागातील वीज खंडित होण्याचे प्रमाणही कायम असेल तर महावितरणच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.