आमदार बावनकुळे, खासदार मेंढेंची नाना पटोलेंच्या विरोधात तक्रार...

पंतप्रधानांना गंभीर धमकी देणारे नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी तक्रारीच्या माध्यमातून आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली.
Sunil Mendhe, Nana Patole and Chandrashekhar Bawankule.
Sunil Mendhe, Nana Patole and Chandrashekhar Bawankule.Sarkarnama

नागपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची धमकी देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)आणि भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी काल रात्री पोलिसांत दिली.

देशाच्या सन्माननीय पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा आणि त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी या कुही पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीच्या माध्यमातून आमदार बावनकुळे आणि इतर भाजप नेत्यांनी पोलिसांना केली. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, आनंदराव राऊत, अजय बोढारे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधानांवर नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरात टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची खासदार सुनील मेंढे व पदाधिकाऱ्यांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

काँग्रेसचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखनी तालुक्यात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बोलताना अत्यंत खालच्या स्तरात टीका केली. त्याबाबतचा व्हिडिओ जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाजप व इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, खासदार सुनील मेंढे, भाजपचे पदाधिकारी मुकेश थानथराटे, रुबी चड्डा, विकास मदनकर आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी पोलिस ठाण्यात जाऊन नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत लेखी तक्रार केली आहे.

Sunil Mendhe, Nana Patole and Chandrashekhar Bawankule.
शिव्याच नाही तर मोदींना मारूही शकतो : नाना पटोले झालेत बेफाम

पटोलेंनी तोंड सांभाळून बोलावे : खासदार मेंढे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखले जातात. देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात वादग्रस्त आणि अपमानजनक वक्तव्य करून पटोलेंनी आपली लायकी दाखवून दिली आहे. पटोलेंच्या या वक्तव्याचा निषेध करीत असून त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी पोलिसांत तक्रारी दाखल करून कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील मेंढे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com