आमदार बाजोरिया म्हणाले, म्हणून जमिनीशी जुळलेल्या व्यक्तीची विचारधारा स्वीकारली !

विधान परिषद निवडणुकीत स्वपक्षीयांनीच घात केल्यानंतर पराभवाची कारणमीमांसा ऐकून घेण्याची विनंती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केली होती.
MLA Bajoriya's press conference against Uddhav Thackeray
MLA Bajoriya's press conference against Uddhav ThackeraySarkarnama

अकोला : विधान परिषद निवडणुकीत स्वपक्षीयांनीच घात केल्यानंतर पराभवाची कारणमीमांसा ऐकून घेण्याची विनंती शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना केली होती. त्यासाठी सहा महिने प्रतीक्षा केली. मात्र, माझे ऐकून घेण्यासाठीही कुणाला वेळ नव्हता. विधान परिषदेचे उपसभापतीपदही दोन वेळा नाकारले. त्यामुळे सन्मानाने व विकासाचा दृष्टिकोन ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असल्याचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी सांगितले.

बाजोरिया यांच्यासह अकोला (Akola) जिल्ह्यातील ३० जण गुरुवारी मुंबईत (Mumbai) शिंदे गटात सहभागी झाले. आमदार विप्लव बाजोरियांसह माजी नगरसेवकांचाही त्यात सहभाग होता. त्यानंतर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून बाजोरिया यांची नियुक्तीही करण्यात आली. काल शुक्रवारी अकोल्यात परत आल्यानंतर त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना समर्थन देण्यामागील भूमिका स्पष्ट करताना शिवसेनेत (Shivsena) होत असलेला कोंडमाराही उलगडून दाखविला. जुने घर सोडून नवीन घरात जाताना मनाला वेदना होतात. त्या मलाही झाल्या आहेत. मात्र नाइलाजास्तव निर्णय घ्यावा लागला. काही लोकांना दबाव टाकून थांबविण्यात आले असल्याचे बाजोरिया यांनी सांगितले.

प्रकाश शिरवाडकर अकोल्यात येऊन बैठक घेवून गेले. मात्र, त्यांनी भेटीलाही बोलावले नाही. उलट मीच येत नसल्याचा कांगावा गेला. माझे स्वतंत्र साम्राज्य आहे, ही मी मान्य करतो आणि हे स्वतंत्र साम्राज्य आजपासून शिंदे यांच्या समर्थनार्थ चालवेल, असे बाजोरियांनी सांगितले. त्यांच्यावर होत असलेल्या सर्व आरोपाचेही त्यांनी यावेळी खंडन केले. शिवसेना पक्ष बदललेला नाही तर जमिनीशी जुळलेल्या व्यक्तीची विचारधारा स्वीकारली असल्याचेही बाजोरिया यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला योगेश अग्रवाल, आश्विन नवले, शशी चोपडे, योगेश बुंदेले, विठ्ठल सरप, मुरलीधर सटाले आदींची उपस्थिती होती.

वारंवार डावलले..

दहा वर्षे नगरसेवक, १८ वर्षे आमदारकी, ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलो. त्यानंतरही वारंवार डावलण्यात आले. कधीही पदाचा आग्रह धरला नाही. अपेक्षा होती व ती बोलूनही दाखविली. मात्र, वारंवार डावलण्यात आले. मतांचे पाठबळ नसताना तीन वेळा निवडून आलो आणि ८५ टक्के मतदान असताना पराभूत झालो. याची कारणमीमांसा करण्यासाठी मातोश्रीवर गेलो, पण भेट नाकारली, याचे दुःख मनात होते, असे माजी आमदार बाजोरियांनी सांगितले.

MLA Bajoriya's press conference against Uddhav Thackeray
BJP: आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपला दे धक्का!

लवकरच जिल्हा कार्यकारिणी..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे अकोला जिल्ह्यासाठी नवीन जिल्हा प्रमुखांसह नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करू. त्यासाठी आजच चर्चा झाली आहे. सर्व नियुक्त्या नव्याने केल्या जातील, असे बाजोरिया यांनी सांगितले.

मनपा निवडणूक भाजपसोबतच..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून योग्य तो वाटा मिळणार आहे. निवडणूक भाजपसोबतच लढविणार असल्याचे बाजोरिया यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in