Bacchu Kadu : आमदार बच्चू कडूंचा ‘अकोला पॅटर्न’ देशासाठी ठरणार दिशादर्शक...

दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यासाठी धावपळ करणाऱ्या अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या (ZP) सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करतो, असे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) म्हणाले.
MLA Bacchu Kadu
MLA Bacchu KaduSarkarnama

अकोला : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून दिव्यांगांना सक्षम बनविणाऱ्या संस्थांना दरवर्षी विशेष पुरस्कार दिला जातो. सन २०२१-२२ या वर्षातील दिव्यांग सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेला हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिल्लीत (Delhi) येत्या ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सौरभ कटियार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, देशात दिव्यांग सर्वेक्षणासाठी एक नवीन संकल्पना या 'अकोला पॅटर्न'च्या (Akola) माध्यमातून समोर येणार असून हे एक मोठे यश आहे. दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यासाठी धावपळ करणाऱ्या अकोल्यातील जिल्हा परिषदेच्या (ZP) सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करतो, असे आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) म्हणाले. दिव्यांग बांधवांचे काम करताना जेव्हा जिल्ह्याचे नाव देशपातळीवर पोहोचते, तेव्हा वेगळाच आनंद होतो, असेही आमदार कडू म्हणाले.

कोला जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची नोंद व त्याची सर्व माहिती संकलन करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात दिव्यांग सर्वेक्षण जानेवारी २०२१ पासून राबविण्यात आले. यासाठी 'दिव्यांग सर्व्हे अकोला' हे ऑनलाइन ॲप तयार करण्यात आले. या माध्यमातून ४५ हजार ६०९ दिव्यांगांचे सर्वेक्षण अकोल्यात करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान प्राप्त होणारा डेटा हा एकत्रित स्वरूपात तयार करून दिव्यांगांच्या कल्याणासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ या माध्यमातून अपंगांना मिळणार आहे. सदर सर्वेक्षणामुळे दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी मूलगामी योजना तयार करून त्या राबविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आता देशात दिव्यांग सर्वेक्षणासाठी एक नवीन संकल्पना या 'अकोला पॅटर्न'च्या माध्यमातून समोर आली आहे.

तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडूंचं यश..

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने धडपड करणारे माजी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जानेवारी २०२१ मध्ये 'दिव्यांग सर्व्हे अकोला' या अॅपची निर्मिती झाली. या अनोख्या सर्वेक्षणाला त्यांनी 'अकोला पॅटर्न' म्हणून संबोधले होते. राष्ट्रीय पुरस्काराने आता त्यांचे अकोला पॅटर्न देशाला दिशादर्शक ठरणार आहे

MLA Bacchu Kadu
Bacchu Kadu : बच्चू कडू म्हणाले, ‘तुम्ही’ आता हा विषय थांबवा...

४५ हजार ६०९ दिव्यांगांचे झालेत सर्वेक्षण..

अकोला जिल्ह्यात मागील वर्षापासून दिव्यांगांच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली. वर्षभरात ४५ हजार ६०९ दिव्यांगांचे सर्वेक्षण जिल्ह्यात झाले आहे. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, प्रभारी समाजकल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी आशा वर्कर, महात्मा गांधी सेवा संघ औरंगाबाद यांसारख्या घटकांच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com