आमदार अभिजित वंजारींनी महापौरांचा असा घेतला समाचार…

भारतात विधिमंडळ आणि संसदेत दोन पदे असावीत आणि नवीन व पात्र व्यक्तींना राजकारणातून Politics सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचे मत त्यांनी MLA Abhijeet Wanjari व्यक्त केले.
Abhijeet Wanjari and Dayashankar Tiwari
Abhijeet Wanjari and Dayashankar TiwariSarkarnama

नागपूर : नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी परवा परवा इंदिरा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर विखारी टिका केली होती. त्यावर एवढ्या वर्षांनंतरही महापुरुषांचे विचार लोकांच्या मनातून जात नाहीत, ते सकारात्मक की नकारात्मक, याचा महापौरांनी विचार करावा, असे म्हणत आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी महापौरांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

आमदार वंजारी म्हणाले, या मंचावरून महापुरुषांबद्दल खूप काही सांगितले गेले. महापौरांनी ज्या प्रकारे त्यांचा उल्लेख केला, त्याबद्दल खेद वाटतो. पण एवढ्या वर्षांनंतरही महापुरुषांचे विचार लोकांच्या मनातून जात नाहीत, ते सकारात्मक की नकारात्मक, याचाही महापौरांनी विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. राजकारणात प्रत्येकाला संधी मिळण्यासाठी आमदार-खासदारांचा जास्तीत जास्त कार्यकाळ निश्चित होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. अमेरिकेच्या धर्तीवर भारतात विधिमंडळ आणि संसदेत दोन पदे असावीत आणि नवीन व पात्र व्यक्तींना राजकारणातून सेवा करण्याची संधी मिळणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार ॲड.आशिष जैस्वाल यांनी निवडणुका जिंकणे आणि पुन्हा पुन्हा आमदार होऊन विधानसभेत जाणे हे वेगळे कौशल्य असल्याचे सांगितले. मात्र, निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्याने सभागृहात चांगली कामगिरी करू नये आणि हे देखील आवश्यक नाही की, जो सभागृहात चांगली कामगिरी करतो तो त्याच्या किंवा तिच्या मतदारसंघात चांगली कामगिरी करतो. विद्यार्थ्यांना संबोधित करताना शहर पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार यांनी लोकशाही आणि समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तरुणांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. नागपूर पोलीस आणि नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसोबत लवकरच हा उपक्रम सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

लोकशाहीमध्ये योग्य वेळी लोक रिटायर्ड करतात. जनता हुशार आहे. त्यामुळे मी रिटायर्ड व्हायचे की नाही, हे सुद्धा जनताच ठरवेल, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित दीक्षान्त सभागृहात आयोजित विद्यार्थी संसदेच्या उद्‍घाटन सत्रात ते बोलत होते.

Abhijeet Wanjari and Dayashankar Tiwari
इतर आमदार पत्रही देत नसताना वंजारी मात्र एक कोटी वाटूनही मोकळे झाले...

या कार्यक्रमात आमदार ॲड. अभिजित वंजारी, ॲड. आशिष जैस्वाल, पोलीस आयुक्त अमितेश कुमार कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ.अभय मुद्‍गल, आयोजन समिती आणि सिनेट सदस्य विष्णू चांगदे, टारझन गायकवाड उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतातील नागरिक हुशार आहेत. ते जाणतात कुणाला केव्हा निवडून द्यायचे आणि कुणाला घरी बसवायचे. त्यामुळेच इतर देशांच्या तुलनेत येथील एक्झीट पोल बदलल्याचे दिसून येतात. न शिकलेला मतदारही मत देताना शिकलेल्या मतदारापेक्षा चांगला विचार करतो. त्यामुळे माझे विधिमंडळ सहकारी ॲड. अभिजित वंजारी यांनी व्यक्त केलेल्या मताला जनता उत्तर देईल, असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com