राज्यपालांच्या भाषणात केवळ भाजप आणि मोदींचाच उल्लेख म्हणत मिटकरींचा निषेध?

देशातील लोकशाहीची समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्ये याच संविधानात आहेत. असे या पत्रात मिटकरींनी (Amol MItkari) नमूद केले आहे.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama

अकोला : गेल्या काही दिवसांत घडलेल्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलंय अन् भारतीय संविधानाची प्रतही त्यांना भेट दिली. अकोल्यात आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३६ दीक्षांत समारंभ दरम्यान, अमोल मिटकरींनी हे पत्र आणि भारतीय संविधान प्रत भेट दिली.

डॉ पंजाबराव देशमुख (Dr. Panjabrao Deshmukh) कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून ३६ व्या दीक्षांत समारंभास आपण स्वत: हजर राहत असल्याने कृषी विद्यापीठ सदस्य म्हणून भारतीय संविधानाची प्रत देऊन आपणास सन्मानित करताना आनंद होतो आहे. कारण देशातील लोकशाहीची समता, स्वातंत्र्य व बंधुता ही मूल्ये याच संविधानात आहेत. असे या पत्रात मिटकरींनी नमूद केले आहे. राज्यपालांनी (Governor) आज केलेल्या भाषणात केवळ नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप यांचाच उल्लेख होता. बाकी विद्यार्थ्यांना देण्यासारखं त्यांच्या भाषणात काहीही नव्हतं, असा आरोपही आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला.

पी.सी. अलेक्झांडर यांची आठवण ..

पी.सी. अलेक्झांडर हे लोकांचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या आजही जनतेच्या स्मरणात आहेत. आपण शिवप्रेमी आहात. व संविधानप्रेमी असाल याबाबत तरी आशादायी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण अनेकदा घटना बाह्य वागलात असे मत विविध घटनातज्ज्ञांनी व्यक्त केले. मग घाईघाईत बेतलेली फ्लोअर टेस्ट, राजकारण्यांना भरवलेले पेढे, १२ आमदारांची प्रलंबित यादी. यामुळे आपली भूमिका वारंवार संशयाच्या भोवऱ्यात येतं असली तरीही आपण संविधानाचा नेहमीच सन्मान करत असाल, याबाबत शंका नाही. आपण शिवनेरी व रायगड स्वतः चढून गेलात हा प्रत्येक मराठी माणसासा‌ठी अभियानाचा क्षण होता.

छत्रपती शिवरायांचाच विचार ज्या भारतीय राज्यघटनेत आलाय. तिचे पालन व संरक्षण आपण निश्चित करावे या अपेक्षेपोटी आपणास ही संविधानाची प्रत देताना आनंद होतोय. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ! संविधानाचे जतन करण्यासाठी कायम कटिबद्ध राहाल.. असेही या पत्रकात उल्लेख करण्यात आलाय. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हेसुद्धा उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in