अल्पवयीन गर्भपात प्रकरण; रुग्णालयाच्या परिसरातून काळवीटाची कातडीही जप्त

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांना रुग्णालयाच्या बायोगॅसच्या खड्ड्यात भ्रुण अवशेष व हाडे आढळली होती
wardha 'illegal abortions case update
wardha 'illegal abortions case update

वर्धा : संपूर्ण राज्यात खळबळ उडवणाऱ्या आर्वी शहरात (Arvi City) अल्पवयीन मुलीचा गर्भपात (illegal abortions) केल्याप्रकरणात वर्धा (Wardha) पोलिसांना तपासादरम्यान धक्कादायक गोष्टी हाती लागल्या आहेत. कदम हॉस्पिटलच्या परिसरात पोलिसांना १२ कवट्या आणि ५४ हाडे ही आढळून आली होती. त्यानंतर आता रुग्णालयाच्या परिसरात काळवीटाची कातडीही जप्त करण्यात आली आहेत. या मुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागल्याचे दिसत आहे. (wardha illegal abortions case update)

दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत वर्धा पोलिसांनी कदम हॉस्पिटलचे डॉ. नीरज कदम आणि त्यांची पत्नी डॉ. रेखा कदम यांना यांच्यासह रुग्णालयाची परिचारिका संगीता काळे आणि डॉक्टरांची सासू संगीता काळे यांनाही अटक करण्यात आली आहे.

wardha 'illegal abortions case update
चंद्रकांतदादांच्या खेळीला दिवंगत आमदाराच्या पत्नीचे प्रत्युत्तर; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

डॉक्टर दाम्पत्यासह अटक केलेल्या संशयित आरोपींवर शासकीय औषधांचा गैरवापर व इतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालय परिसरातील गॅस चेंबरमध्ये 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली होती. त्यानंतर पोलिसांनी आणखी तपास केला असता रुग्णालयाच्या परिसरातून काळवीटाची कातडी आढळून आली आहेत. पोलिसांनी काळवीटाची कातडी जप्त करून वनविभागाच्या ताब्यात दिल्याती माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?
सहा महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर या प्रकरणात मुलीला गर्भधारणा झाली. मात्र अल्पवयीन मुलाच्या कुटूंबियांनी पीडितेच्या आई वडिलांना मुलीचा गर्भपात करण्यात आम्ही पैसे लावू, मात्र याची वाच्यता पोलिसांकडे केल्यास सर्व गावात बदनामी करु, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात मुलीचा गर्भपात करण्यात आला.

या प्रकरणाची माहिती आर्वी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी परवानगी घेऊन कार्यवाही सुरु केली. पोलिसांनी दूसऱ्या दिवशी सकाळीच डॉ. रेखा कदम यांच्यासह आरोपी मुलाच्या आई आणि वडिलांना अटक करत अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com