अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी विश्वजीत कदम आले धावून; आपल्या वाहनातून पोचवलं रुग्णालयात

तातडीने मदत मिळाल्याने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री डॅा. विश्वजीत कदम यांचे आभार मानले.
 Vishwajeet Kadam
Vishwajeet KadamSarkarnama

भंडारा : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आज सकाळी भंडाऱ्याकडे (Bhandara) जात असताना रस्त्यात दिसलेल्या अपघातातील (Accident) जखमींना पालकमंत्री डॅा. विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी, आपल्या वाहनात बसवून आणले व त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. या घटनेमुळे कदमांच्या संवेदनशीलतेचा अनुभव अपघातग्रस्तांसह येथील नागरिकांना रविवारी (ता.1 मे ) आला. तातडीने मदत मिळाल्याने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी पालकमंत्री कदमांचे आभार मानले.

 Vishwajeet Kadam
मी वयाच्या पाचव्या दिवशीच झेडपीच्या सभागृहात उपस्थित होतो; पवारांनी सांगितला 'तो' किस्सा

मंत्री डॉ. कदम हे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आज सकाळी नागपूरहून भंडाऱ्याकडे येताना राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यातील मौद्याजवळ त्यांना अपघात झाल्याचे दिसले त्यावेळी त्यांनी तत्काळ आपल्या शासकीय गाड्यांचा ताफा थांबविला आणि येथील स्थितीची चौकशी केली. झालेल्या अपघातात महिलेच्या डोक्याला जबर मार लागल्याचे त्यांना दिसले त्या महिलेला डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. यावेळी पालकमंत्री कदमांनी जास्त वेळ न घालता अपघातग्रस्तांना तातडीने आपल्या वाहनात बसवले आणि पुढील वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापुर्वी त्यांनी अपघाताची सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. फारूकी यांना दिली होती. यामुळे जखमींवर तत्काळ उपचार सुरू झाले.

 Vishwajeet Kadam
सभेपूर्वीच राज ठाकरेंना केलं टार्गेट ; कोण काय म्हणाले ?

या अपघातात जखमी झालेल्या दमयंती येले (वय ४५) रा. मुंडीपार ता. सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी डॅा. कदमांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com