पूजाच्या पेंटींग भारावले मंत्री सुनील केदार, म्हणाले अद्भूत कलाकृती...

केळवद येथील नवनव्या संकल्पना साकारणारी पूजा धोटे Pooja Dhote ही कलावंत यातीलच एक. तिने मंत्री सुनील केदार Minister Sunil Kedar यांची रेखाटलेली पेन्टींग बघून मंत्रिमहोदय केदार हेही थक्क झाले.
Minister Sunil Kedar with Pooja Dhote and her penting.
Minister Sunil Kedar with Pooja Dhote and her penting.Sarkarnama

केळवद : राजकारणात वावरणारे लोकही कलाप्रेमी असू शकतात. आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून कलावंतांना प्रोत्साहन देणे काही पुढाऱ्यांना जमते. त्यातील विदर्भातील एक प्रभावी नेतृत्व म्हणजे पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार. मंत्री केदार स्वतः फिटनेस जपण्यासाठी नियमित व्यायाम करतात आणि इतरांनाही प्रोत्साहन देतात. त्याचप्रमाणे कलावंताबद्दलही त्यांना विशेष आदर आहे. येथील पूजा धोटे हिच्या घरी जाऊन तिने काढलेली पेंटींग त्यांनी बघितले. सुरेख पेंटींग बघून ते अक्षरशः भारावले आणि त्यांच्या तोंडून एकच शब्द निघाला तो म्हणजे अद्भूत...

कला म्हणजे विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी, ही मांडणी प्रत्येक कलेला ‘ग्लॅमर’ देत असते. या ग्लॅमरच्या दुनियेत ‘फेम’ मागे धावणारे अनेक कलावंत पहायला मिळतात. काही कलावंत अपवाद ठरत कलेशी व स्वत:शी प्रामाणिक राहत आपल्या कलेचा आनंद इतरांना देतात. सावनेर तालुक्यातील केळवद येथील नवनव्या संकल्पना साकारणारी पूजा धोटे ही कलावंत यातीलच एक. तिने मंत्री सुनील केदार यांची रेखाटलेली पेन्टींग बघून मंत्रिमहोदय केदार हेही थक्क झाले.

मंत्री केदारांची ही पेंटिंग नुकतीच केळवद येथील पूजा चंद्रभान धोटे यांच्या घरी मंत्री केदार यांना प्रदान करण्यात आली. इयत्ता पाचवीपासून चित्रकलेत आवड असलेली पूजा पदवीनंतर सध्या मास्टर ऑफ फाईन आर्टस (म्युरल पेन्टींग )चे शिक्षण घेत आहे. चित्रकलेच्या स्पर्धेत पूजाने राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार सुप्त गुणांच्या जोरावर पटकाविले. चित्रकलेच्या प्रदर्शनीतही तिने डंका वाजविला आहे. मंत्री केदार हे जिल्ह्यातील प्रभावी नेतृत्व आणि युवकांचे प्रेरणास्त्रोत असल्याने, तसेच सावनेर विधानसभा क्षेत्रात प्रतिभाशाली आणि गौरवास्पद कार्य करणाऱ्या लाडक्या नेत्याची रेखाटलेली पेंटिंग माझ्यासाठी अभिमानास्पद असल्याचे पूजा धोटेने सांगितले.

माझ्या घरामध्ये कलेचा वारसा नसला तरी मला माझ्या कुटुंबांतील सदस्यांनी मला प्रोत्साहित केले. कलेकडे केवळ छंद म्हणून न पाहता यामध्ये करिअर करणाऱ्यांनी एक उद्दिष्ट ठेवायला हवे. भविष्यात कला विकास केंद्र स्थापन करून यात मला गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना वैश्विक स्तरावरच्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील प्रतिभावंत कलाकारांची देश पातळीवर नावलौकिक करण्यासाठी सरकारी कामांमध्ये कलावंतासाठी दालन असणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक प्रतिभावंत कलाकाराला यात काम मिळेल आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास सहकार्य होईल.

Minister Sunil Kedar with Pooja Dhote and her penting.
तुम्ही आधी दोन लावा; पोलिस केस मी बघेन, सुनील केदार झाले आक्रमक...

-पूजा चंद्रभान धोटे, चित्रकार, केळवद.

ग्रामीण भागात बरेच प्रभावशाली कलाकार दडले आहे. यापैकीच एक म्हणजे पूजा हिने रेखाटलेली माझी पेंटिंग कौतुकास्पद आहे. अशा कलावंतांना भविष्यात माझ्याकडून पूर्ण सहकार्य असेल.

-सुनील केदार

पशुसंवर्धन व क्रीडा मंत्री.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com