मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘किसानों के लिये, अब सरकार उतरी मैदान मे !’

सरकार म्हणून शेतकऱ्यांची योग्य दखल घेण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना या स्थितीतून सावरण्यासाठी मोठी मदत होणार आहे, असेही मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.
Sudhir Mungantiwar, Eknath Shinde and Devendra Fadanvis
Sudhir Mungantiwar, Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : गेल्या महिनाभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. पण का तो मुहूर्त निघाला आणि १८ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. विस्तारानंतर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला. अजूनही राज्यभर (Maharashtra) पावसाचा हाहाकार सुरू आहे. काल रात्रीपासून तर पावसाने कहरच केला. सर्वत्र मुसळधारेने जनता हैराण झाली आहे. घरांच्या पडझडीसह शेतांचे मोठे नुकसान झाले आहे. निकषानुसार मिळणारी भरपाई कमी आहे, अशी ओरड शेतकऱ्यांकडून होत होती. शेतकरी हवालदिल झाला आहे. पण आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. कारण राज्य सरकारने शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत वाढवून दिली आहे आणि हेक्टराची मर्यादाही वाढवून दिली आहे.

या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, खऱ्या अर्थाने ‘किसानो के सम्मान में, भाजप-सेना सरकार मैदान मे’ आली आहे. कारण पूरपरिस्थितीचा दौरा करीत असताना शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून बघितल्या. त्यानंतर शेतकऱ्यांना सरकारतर्फे देण्यात येणारी मदत तोकडी ठरेल, असे लक्षात आले. म्हणून मग ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सांगितली होती. सरकार म्हणून शेतकऱ्यांची योग्य दखल घेण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना या स्थितीतून सावरण्यासाठी मोठी मदत होणार आहे, असेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar, Eknath Shinde and Devendra Fadanvis
लोकांचे हाल बघून आमदार मुनगंटीवार वेकोलिच्या महाप्रबंधकावर बरसले, म्हणाले...

आजच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात १५ लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना दिलासा देण्यासाठी शिवसेना भाजप सरकारने विशेष बाब म्हणून आतापर्यंत कधीही नुकसान भरपाई मिळाली नाही तेवढी, म्हणजे एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जी मदत दिली जात होती त्याच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे ६ हजार ८०० रुपये मदत मिळत होती. त्यापेक्षा दुप्पट मदत आम्ही देणार आहोत अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. म्हणजे आता प्रतिहेक्टर १३ हजार ६०० रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तसेच २ हेक्टरची मर्यादा वाढवून ती ३ हेक्टर केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा निर्णय असल्याचेही मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com