मंत्री संजय राठोड म्हणाले, तीन चाकांचे सरकार नीट चालत नव्हते, म्हणून...

त्यामुळे ज्यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करून लढलो, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे राठोड (Sanjay Rathod) म्हणाले.
Sanjay Rathod
Sanjay RathodSarkarnama

यवतमाळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार मनाला भावले. त्यामुळेच मी शिवसेनेत आलो. शाखाप्रमुख ते मंत्रिपदापर्यंत माझा प्रवास झाला. 18 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले. या काळात जिल्ह्यातील घराघरांत शिवसेना (Shivsena) पोहोचविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच संघटना व विधानसभेत संधी दिल्याचे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी सांगितले.

स्थानिक अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात आज आयोजित सत्कार कार्यक्रमात राठोड बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) बनविले होते. हे पूर्णपणे अनैसर्गिक सरकार होते. तीन चाकांचे ते सरकार व्यवस्थित चालत नव्हते. त्यामुळे ज्यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करून लढलो, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे राठोड म्हणाले. राजकारण म्हटले की, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र, मला राजकीय आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले गेलेत. ‘त्या’ 15 महिन्यांच्या काळात मी आणि माझ्या परिवाराने काय भोगले, हे आम्हालाच माहिती, असेही राठोड म्हणाले. ज्या झाडाला फळे असतात, त्याच झाडाला गोटे मारली जातात. बाभळीच्या झाडाला कुणीच गोटे मारीत नाहीत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे आरोप करणार्‍यांचा राठोड यांनी समाचार घेतला. यावेळी दारव्हा-दिग्रस-नेर मतदारसंघातील संजय राठोड समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खुनी, बलात्कारी म्हणून मला पाहत होते

राजकारण खूप खालच्या स्तरावर गेले आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आलेत. त्यामुळे खुनी, बलात्कारी म्हणून मला पाहत होते. त्यांची चौकशी व्हावी, म्हणूनच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या आरोपात तथ्य नसून, आरोप बिनबुडाचे असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळेच मला नागरिकांची सेवा करण्याची संधी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मिळाल्याचेही मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

Sanjay Rathod
चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा..,पोहरादेवीच्या महंतांचा इशारा

दिग्रस येथे आज आगमन

शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेटमंत्री संजय राठोड आज बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोहरादेवी येथे दर्शन व धर्म परिषदेसाठी दिग्रसमार्गे जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर दिग्रस शहरात त्यांचे प्रथमच आगमन होत आहे. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राठोड यांचे आगमन होणार आहे. या ठिकाणी दिग्रस शहरासह तालुक्यातील समर्थकांतर्फे मंत्री संजय राठोड यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com