बच्चू कडू, आंबेडकरांची भेट: राज्यात नवीन समिकरण जुळणार?

भेटीनंतर मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Bachchu Kadu, Prakash Ambedkar
Bachchu Kadu, Prakash Ambedkarsarkarnama

अकोला : भाजप व वंचित बहूजन आघाडी वगळता जिल्ह्यातील राजकारणात इतर पक्षांमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व प्रहारचे नेते राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची अकोल्यात भेट झाली. ही भेट जिल्ह्यातील एका नवीन राजकीय समिकरणाला जन्म देणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचा श्रीगणेशा जिल्हा परिषदेतील राजकारणातून होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

आंबेडकर यांच्यावर हृदय विकाराची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन महिने ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. त्यांच्या अनुपस्थितीत वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषद पोटनिवडणूक लढविली. आता पुन्हा ॲड. आंबेडकर सक्रिय झाले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ते तीन दिवस अकोल्यात मुक्कामी होते. याचदरम्यान शनिवारी बच्चू कडू यांनी अकोल्यात त्यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. या सदिच्छ भेटीनंतर मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रहारची अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एन्ट्री झाली. येथील राजकीय वर्तुळात निर्माण झालेली पोळकी भरून काढण्याच्या दृष्टीने प्रहारकडे बघितले जात आहे.

Bachchu Kadu, Prakash Ambedkar
शिवसेना-भाजपमध्ये रंगणार आणखी एक सामना; पण, महाराष्ट्राबाहेर

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांना एकत्र आल्यानंतरही जिल्ह्यात फारसा प्रभाव पाडता आला नसल्याचे पोटनिवडणुकीतून दिसून आले. त्यात काँग्रेसची एकला चलोची भूमिका महाविकास आघाडीसाठी मारक ठरली. अशा परिस्थितीत प्रहारने अकोला जिल्हा परिषदेत एन्ट्री करताना महाविकास आघाडीच्या अपयशाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेली ॲड. प्रकाश आंबेडकर व बच्चू कडू यांची भेट जिल्ह्यातील एका नव्या राजकीय समिकरणाला जन्म देणारी ठरू शकते, असे संकेत मिळू लागले आहेत.

Bachchu Kadu, Prakash Ambedkar
ईडी, पाऊस राष्ट्रवादीसाठी 'लकी' : सुप्रिया सुळे

जिल्हा परिषदेत सोबत येण्याचे संकेत

अकोला जिल्हा परिषदेतील १४ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अपयशामुळे वंचित बहुजन आघाडीला जीवदान मिळाले आहे. मात्र, संख्या बळाचा विचार करता भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून वंचित गाफिल राहणार नाही, याचे संकेत बच्चू कडू यांच्या भेटीतून मिळाले आहेत. दोन सभापतींच्या निवडणुकीत प्रहारला सोबत घेत जिल्ह्यातील नवीन राजकीय समिकरणाची मुहुर्तमेढ रोवल्या जाऊ शकते, अशी चर्चाही या भेटीनंतर सुरु झाली आहे.

महानगरपालिका निवडणुकीकडेही लक्ष

वंचित बहुजन आघाडीने ग्रामीण भागात चांगला जम बसविला असला तरी महानगरपालिका क्षेत्रात अपेक्षित यश या पक्षाला मिळाले नाही. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा विचार करता वंचित-प्रहार एकत्र झाल्यास मनपा निवडणुकीच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com