राज्यमंत्री बच्चू कडू मध्यरात्री मदतीला धावले, अन् युवकाचे प्राण वाचले...

राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे आपातापामार्गे अकोल्याकडे येत असताना मार्गात एक अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ताफा थांबून अपघातग्रस्तांना मदत केली.
Bacchu Kadu News in Marathi, Akola Latest Marathi News
Bacchu Kadu News in Marathi, Akola Latest Marathi NewsSarkarnama

अकोला : राज्यमंत्री आणि अकोल्याचे (Akola) पालकमंत्री (Guardian Minister) बच्चू कडू हे सतत ॲक्टीव असतात. आता मंत्री आहेत, पूर्वी आमदार होते. पण जेव्हा ते काहीही नव्हते, तेव्हापासून संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. आज मंत्री असतानाही त्यांचा कुठलाही बडेजाव नसतो. काल मध्यरात्री प्रवासात असताना एक युवक दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडलेल्या त्यांना दिसला. लगेच ताफा थांबवून त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. (Bacchu Kadu News in Marathi)

त्या युवकाचा अपघात कसा झाला, कोणत्या वाहनासोबत टक्कर झाली, की तो एकटाच दुचाकी घसरून पडला, याची माहिती मिळू शकली नाही. बच्चू कडूंनी त्याला तात्काळ उपचार मिळवून दिल्यामुळे युवकाचे प्राण वाचले. थोडा उशीर झाला असता, तर कदाचित तो दगावला असता, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नंतर सांगितले. तात्काळ उपचार मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्यामुळे बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) तत्परतेचे आज कौतुक होत आहे.

राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू हे आपातापामार्गे अकोल्याकडे येत असताना मार्गात एक अपघात झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच ताफा थांबून अपघातग्रस्तांना मदत केली व अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात पाठविले. राज्यमंत्री बच्चू कडू हे दर्यापूरवरुन अकोला मार्गे अहमदनगरकडे निघाले असताना काल मध्यरात्री वाटेत आपातापाजवळून त्यांचा ताफा जात असताना त्यांना एक अपघात झाल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच ताफा थांबून ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले.

Bacchu Kadu News in Marathi, Akola Latest Marathi News
Video : चालीसा, भोंगे यासारखे मुद्दे उपस्थित करणारे मूर्ख : बच्चू कडू

या अपघातात जखमी झालेल्या इरफान चौहाण या वाशीम बायपास गंगानगर येथील रहिवासी युवकाला पालकमंत्र्यांनी मदत करीत त्याला देवकी हॉस्पिटल येथे पाठविले. तातडीने मदत मिळाल्यामुळे या युवकाचे प्राण वाचले. कोणताही प्रोटोकॉल न पाळता केवळ मानवतेच्या नात्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जखमींना मदत केल्याने अपघातग्रस्त युवकाचे प्राण वाचू शकले. अपघातग्रस्त व त्याच्या त्यांचे नातेवाइकांनी पालकमंत्री बच्चू कडू यांचे आभार मानले. यापूर्वीही अनेक वेळा बच्चू कडू यांनी अपघातग्रस्तांना मदत करून त्यांचे प्राण वाचविले आहेत. कोणताही भेदभाव न करता गरजवंतांच्या मदतीला धावून जाणारे पालकमंत्री बच्चू कडू यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com