रणरणत्या उन्हात मजुरी करून राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिले वंचितला उत्तर…

‘मी भ्रष्टाचार केलाच नाही, सिद्ध केले तर हात कलम करून देईन...’, असे बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) सांगितले होते. पण तरीही गुन्हे दाखल झाल्यामुळे ते व्यथित झाले
Bacchu Kadu working on road
Bacchu Kadu working on roadSarkarnama

अकोला : शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या हटके आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. आमदारकीची आत्तापर्यंतची कारकीर्द आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम करीत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. पण वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.

अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर काम करून अपहार केल्याचा आरोप वंचितने (Vanchit Bahujan Aghadi) राज्यमंत्री कडू यांच्यावर केला. येवढ्यावर वंचित थांबली नाही, तर त्यांच्या विरोधात न्यायालयात गेले आणि न्यायालयाच्या (Court) आदेशावरून बच्चू कडूंवर (Bacchu Kadu) गुन्हे दाखल करण्यात आले. पण ‘मी भ्रष्टाचार केलाच नाही, सिद्ध केले तर हात कलम करून देईन...’, असे बच्चू कडूंनी सांगितले होते. पण तरीही गुन्हे दाखल झाल्यामुळे ते व्यथित झाले आणि आपले दुःख व्यक्त करण्यासाठी आज त्यांनी ४५ डिग्री सेल्सिअस तापमानात त्याच रस्त्यावरील कामावर इतर मजुरांसोबत मजुरी केली.

आंदोलनाच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात अनोख्या पद्धतीने उत्तर दिलंय. बच्चू कडू यांनी आज अकोल्यात 45 डिग्री तापमानात श्रमदान करून विरोधकांना उत्तर दिलंय. अकोल्यात वंचितचे उपाध्यक्ष पुंडकर यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. दरम्यान ही तक्रार खोटी असल्याचा आरोप पालकमंत्री बच्चू कडू यांनी केलाय. त्यामुळे मी या तक्रारीमुळे खूप दुःखी झालो असून दुःख व्यक्त करण्यासाठी भर उन्हात श्रमदान करत असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

डीपीडीसीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री बच्चू कडू यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार केला आहे. फसवणूक केली आहे. अस्तित्वात नसलेले रस्ते व ग्रामा नंबर नसलेले रस्ते बांधण्यात आले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. त्यानुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हाही दाखल झाला होता. या सर्व प्रकाराला उत्तर देण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी श्रमदान करून आपले दुःख निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Bacchu Kadu working on road
Video : मी वरच्या कोर्टात अपील करणार - बच्चू कडू

डाबकी रोड येथील कॅनाल रोडवर असलेल्या गोरोबा महाराजांच्या मंदिरात समोरील रस्त्यावर त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये श्रमदान केले. यावेळी कार्यकर्त्यांनी या श्रमदानामध्ये सहभाग घेतला. संपूर्ण रस्त्यावर त्यांनी मुरूम टाकला. भर उन्हामध्ये त्यांनी हे श्रमदान केले. यावेळी शहर अध्यक्ष मनोज पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले. तसेच महिला पदाधिकारीही यावेळी उपस्थित होत्या. येथे आलेल्या नागरिकांसोबत पालकमंत्री कडू यांनी संवाद साधत त्यांचे निराकरण केले. नागरिकांची निवेदनेही स्वीकारली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com