मंत्री नवाब मलिक यांनी टाकला ‘त्या’ वादावर पडदा...

काँग्रेससह इतर विरोधकांना सोबत घेऊन मोट बांधण्याचे प्रयत्न मागील एक वर्षापासून पवार (Sharad Pawar) करीत असल्यांचे नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama

भंडारा : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात उभारल्या जात असलेल्या संघटनेतून कॉंग्रेसला डावलले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्या वादावर आज अल्पसंख्याक मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पडदा टाकला आहे.

गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवाब मलिक म्हणाले, शरद पवार हे सामुदायिक नेतृत्वावर विश्वास करतात. त्यामुळे काँग्रेस वगळून संपुआ होऊ शकत नाही. शरद पवार सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि काँग्रेस सोडून संपुआ होईल, प्रश्न त्यांनी मोडीत काढला आहे. काँग्रेससह इतर विरोधकांना सोबत घेऊन मोट बांधण्याचे प्रयत्न मागील एक वर्षापासून पवार करीत असल्यांचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. 150 खासदारांना एकत्र करून संपुआ आणि त्याबाहेरच्याही लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न पवार करीत असल्याचे ते म्हणाले.

मी आखाड्यात दोन-दोन हात करायला तयार..

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी सुरू केलेल्या आखाड्यात मी दोन दोन हात करायला आहे. प्रवीण दरेकरांनी बँकेत केलेले घोटाळे मी बाहेर काढत असल्यामुळे त्यांनी माझ्यावर एक हजार कोटीचा दावा केला आहे. नवाब मलिक कोणाला घाबरत नाही. जेथे अन्याय, तेथे मी बोलेन, मी कुणाला घाबरत नाही. जो डर गया वो मर गया, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी दरेकरांना लगावला.

प्रवीण दरेकर हे मजूर सोसायटीचे सदस्य झाले. पण ते या पदासाठीसुद्धा लायक नसल्याचे खोचक टिका मलिक यांनी केली. दुसरीकडे मी देखील या बँकेत खातेदार असल्याने मी घोटाळे उघडे करेल, या भीतीने दरेकर माझ्यावर हजार कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोबतच विरोधक अनिल देशमुखांप्रमाणे माझ्याविरोधातदेखील षड्यंत्र रचत असून माझी हत्या केली तरी मी घाबरणार नाही, असा सूचक इशारा मलिक यांनी दिला आहे.

Nawab Malik
भाजपच्या माजी मंत्र्यांनी मंदिराच्या नावाखाली शेकडो एकर जमीन बळकावली : नवाब मलिक

आम्ही नाही पाहिला असा ‘सामना’

ममता बॅनर्जी ह्या फॅसिस्ट आहेत, हे मी मान्य करीत नाही, असे विधान नवाब मलिक यांनी भंडारा येथे केले आहे. आज सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेद्वारे ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात आला असून ममता बॅनर्जी यांचे राजकारण फॅसिस्ट प्रवृत्तीचे असल्याचे उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या राजकारणातून फॅसिस्ट प्रवृत्तीला बळ मिळत असल्याचा घणाघाती शिवसेनेने केला आहे. याबाबत विचारले असता आम्ही नाही पहिला कधी असा ‘सामना’, असा खोचक टोला मालिकांनी लगावला आहे.

ममता बॅनर्जी मोदींच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे त्यांना फॅसीस्ट म्हणणे चुकीचे आहे. युपीए नेतृत्वाबाबत शिवसेनेने दिलेल्या सल्ल्याबाबत सांगताना मलिक म्हणाले, शरद पवार हे सामुदायिक नेतृत्वावर विश्वास ठेवणारे आहेत. जसा महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस -भारतीय कॉंग्रेस यांना एकत्र आणण्याचा चमत्कार त्यांनी केला. तसाच २०२४ मध्ये केंद्र सरकारच्या विरोधात करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमच्यात काही मतभेद असले तरी त्यांना दूर करून कशा पद्धतीने नॉन युपीएला एकत्रित आणता येईल, याचा प्रयत्न शरद पवार करीत असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com