Metro Rail Corporation News: ब्रिजेश दिक्षितांनंतर मेट्रोचे स्टेअरिंग नितीन करीरांच्या हाती...

Nitin Karir News: आता त्यांच्यावर मेट्रोची जबाबदारी आली आहे.
Nitin Karir and Brajesh Dixit
Nitin Karir and Brajesh DixitSarkarnama

Maharashtra Metro Rail Corporation News: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय महासंचालक ब्रिजेश दीक्षित यांना मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नकार दिल्यानंतर त्यांची जागा आता नितीन करीर यांनी घेतली आहे. मेट्रो हा करीरांकडे अतिरिक्त प्रभार आहे आणि मेट्रोचे काम ते मुंबईतून हाताळणार असल्याची माहिती आहे. (He will handle the metro work from Mumbai)

नितीन करीर नगरविकास विभाग एकचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. नंतर महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते वित्त विभागाचे प्रधान सचिव आहेत. आपले मूळ काम सांभाळून ते मेट्रोचे काम करणार आहेत. त्यामुळे नागपुरात सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्याचे काम त्याच वेगाने होईल की नाही, अशी शंका नागपूरकरांना आहे.

आतापर्यंत मंत्रालयातच त्यांनी जास्तीत जास्त काम केले आहे आणि आता त्यांच्यावर मेट्रोची जबाबदारी आली आहे. नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही झाले. ब्रिजेश दीक्षितांनी अल्पावधीत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले आणि विक्रम प्रस्थापित केला. दुसऱ्या टप्प्याचेही काम तसेच व्हावे, अशी अपेक्षा करीर यांच्याकडून गेली जात आहे.

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येत आहे. नागपूर शहरानजीकचे खेडेपाडे जोडणे आणि तेथील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणणे, हा मेट्रो टप्पा दोनचा उद्देश आहे. ग्रामीण भागात मेट्रोचे जाळे वेगाने विणले जावे, अशी ग्रामीण जनतेची अपेक्षा आहे. या सर्व अपेक्षापूर्तीसाठी नितीन करीरांना नागपुरात जोमाने काम करावे लागणार आहे.

Nitin Karir and Brajesh Dixit
Nagpur Police : अकोल्यातील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर !

मुंबईत (Mumbai) वित्त विभागाचा कारभार सांभाळून नागपूर मेट्रोचे काम वेगाने कसे होईल, यावर त्यांना काम करावे लागणार आहे. मेट्रोचा (Metro) पहिला टप्पा हा नागपूरकरांसाठी औत्सुक्याचा विषय होता. दरम्यान नागपूर मेट्रोबाबत विविध चर्चा होत होत्या. काही अंशी मेट्रोला विरोधही झाला. नंतरच्या काळात विरोधक शांत झाले आणि वेगाने कामे झाली.

आज नागपूरकर ऑटोमॅटीव्ह चौकापासून ते मिहान आणि पार्डी नाक्यापासून ते लोकसेवानगरपर्यंत मेट्रोचा लाभ घेत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. कारण मेट्रोने विद्यार्थ्यांसाठी ३० टक्के सवलतीची योजना आणली.

Nitin Karir and Brajesh Dixit
Nagpur BJP News : गडकरी आणि फडणवीसांसोबत उत्तम ताळमेळ, प्रवीण दटकेच राहणार भाजपचे अध्यक्ष ?

थोडक्यात काय तर नितीन करीरांच्या कामाची तुलना ब्रिजेश दीक्षितांच्या कामाशी केली जाईल आणि दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन लवकरात लवकर प्रवाशांच्या उपयोगी पडावा, अशी नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची अपेक्षा आहे आणि हीच खरी नितीन करीर यांच्यासमोरची कसोटी असणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in