MP Dhanorkar : 'भारत जोडो'च्या समर्थनार्थ उद्या चंद्रपुरात सामाजिक संघटनांची बैठक...

चंद्रपूर (Chandrapur) शहरातील हॉटेल एन. डी. येथे आयोजित करण्यात आली आहे. खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.
Prathbha Dhanorkar, Balu Dhanorkar, Vijay Wadettiwar and Abhijeet Wanjari
Prathbha Dhanorkar, Balu Dhanorkar, Vijay Wadettiwar and Abhijeet WanjariSarkarnama

नागपूर : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेत देशातील प्रगतीशिल आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, साहित्यिक, कलावंत, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी चंद्रपूर शहरातील सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक उद्या ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता चंद्रपूर (Chandrapur) शहरातील हॉटेल एन. डी. येथे आयोजित करण्यात आली आहे. खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे.

जातीय, धार्मिक विद्वेषाचा आणि सामाजिक विषमतेचा बिमोड करत संपूर्ण भारत जोडणा-या या यात्रेचे आज नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात (Maharashtra) आगमन झाले. फॅसिझम, कम्युनलिझम आणि क्रोनी कॅपिटलिझमच्या विरूध्द पुन्हा एकदा समाजातील जबाबदार घटक एकत्र येत आहेत. त्या दृष्टीने भुमिका निश्चित करण्यासाठी उद्या सायंकाळी सहा वाजता गांधी विचारवंत चंद्रकांत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनात ही बैठक होणार आहे. बैठकीला माजी मंत्री तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार, (Vijay Wadettiwar) राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (Prathbha Dhanorkar) यांची उपस्थिती राहणार आहे.

भारत जोडो यात्रेसंदर्भात या बैठकीत संवाद आणि विचार व्यक्त होणार आहेत. बैठकीला चंद्रपूर शहरातील आणि जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रपूरचे खासदार आणि या बैठकीचे आयोजक बाळू धानोरकर यांनी दिली.

स्वागतासाठी जनता उत्सूक : विजय वडेट्टीवार

भारत जोडो यात्रेचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. राज्यातील जनतेमध्ये जोम आणि उत्साह संचारला आहे. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास देगलूर येथे सीमेवर महाराष्ट्रात यात्रेचं आगमन होणार आहे. लाखो लोक स्वतःहून यात्रेच्या स्वागतासाठी तेथे पोहोचत आहेत. हजारो गाड्यांतून लोक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूतो न भविष्यति असं स्वागत राहुल गांधींच्या यात्रेचं महाराष्ट्रात होणार आहे, असे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

Prathbha Dhanorkar, Balu Dhanorkar, Vijay Wadettiwar and Abhijeet Wanjari
आदिवासींसाठी सरसावले बाळू धानोरकर; म्हणाले, स्वतंत्र रेजिमेंट निर्माण करा...

या यात्रेमध्ये कॉंग्रेस म्हणून आम्ही फारशी भूमिका पार पाडत नाही आहोत. तर लोक स्वतःहून यात्रेत सहभागी होत आहेत. दुभंगलेली मने जोडणे, हा या यात्रेचा उद्देश आहे. धार्मिकतेची वाढलेली दरी बुजवायची आहे. आपसी मतभेदांमुळे देश अशांत होत चालला आहे. शांततेच्या पथावर जाऊन गांधीजींच्या मार्गाने या देशाला पुन्हा उभारी मिळावी, सर्वसमावेशक, सर्व धर्मांचा सन्मान करणारा, आदर करणारा, जात धर्मांच्या पलीकडे जाऊन एकसंघ भारत निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. विरोधक सोडले तर आज प्रत्येकाला वाटत आहे की, याच मार्गाने हा देश पुढे जावा. म्हणूनच भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे, असे आमदार वडेट्टीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com