अजित पवारांची व्हीसी अन् सल्लागार समितीची बैठकही रद्द, अधिवेशनाबाबत अनिश्‍चितता...

उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी अधिवेशनासंदर्भातील व्हीसी लांबणीवर टाकली. तसेच अधिवेशन कामकाज सल्लागार समितीची गुरुवारची बैठक रद्द करण्यात आली आहे.
Assembly Building in Nagpur.
Assembly Building in Nagpur.Sarkarnama

नागपूर : ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची वाट सर्वपक्षीय आमदार आतुरतेने बघत आहे. पण सरकारमधील मंत्री नागपुरात काय पण मुंबईतही अधिवेशन घेण्यास इच्छुक नाहीत. मंत्र्यांनी विरोधकांसह स्वपक्षीय आमदारांचीही धास्ती घेतली आहे. त्यामुळेच की काय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनासंदर्भातील व्हीसी लांबणीवर टाकली. तसेच अधिवेशन कामकाज सल्लागार समितीची गुरुवारची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार की नाही, हा प्रश्‍न आज तरी अनुत्तरित आहे.

सात डिसेंबर हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित झाली आहे. आठवडाभरापूर्वी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत नागपूरला येऊन केले. त्यांनी अधिवेशनाचा आढावा घेतला. विविध अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली, तसेच विधिमंडळ परिसराची पाहणीसुद्धा केली होती. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ५० कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन केले होते. साहित्य खरेदीच्या निविदाही काढल्या होत्या. मात्र बाजारभावापेक्षा पाचपट अधिक किमतीच्या निविदा मान्य केल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. शेवटी खरेदीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय मंत्र्यांचे निवासस्थान रविभवन, राज्यमंत्र्यांचे निवासस्थान नाग भवन, आमदार निवासाची रंगरंगोटी, डागडुजीची कामेही थांबवून ठेवण्यात आली आहेत.

अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी गुरुवारी (ता.२८) कामकाज सल्लागार समितीची बैठक निश्चित करण्यात आली होती. ती अचानक रद्द केली आहे. ती रद्द का करण्यात आली त्याबाबत अद्याप कोणीच बोलले नाही. तत्पूर्वी अधिवेशनाच्या तयारी संदर्भात सचिव राजेंद्र भागवत मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर करणार होते. तोसुद्धा अद्याप सादर केलेला नाही. गुरुवारीच अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे जिल्हाधिकाऱ्यांसह प्रमुख अधिकाऱ्यांसोबत अधिवेशनाबाबत चर्चा करणार होते. मात्र ही व्हिडिओकॉन्फरन्सींगसुद्धाा रद्द करण्यात आली. त्यामुळे हिवाळी अधिवेशन ठरलेल्या तारखेला होईल, याची शाश्वती नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ते मुंबईला होईल की पुढे ढकलण्यात येईल, याबाबत आत्ताच काही सांगता येणार नसल्याने एका अधिकाऱ्याने ‘सरकारनामा’सोबत बोलताना सांगितले.

Assembly Building in Nagpur.
शिवसेना नेत्यानेच केली अजित पवार अन् नितीन राऊतांच्या राजीनाम्याची मागणी

पुन्हा कोरोनाचे सावट?

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. मुंबईत परतल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यांनीच सोशल मीडियावर याची माहिती दिली. मनसेचे नेते राज ठाकरे हेसुद्धा कोरोनापॉझिटीव्हह आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे अधिवेशन नागपूरमध्ये भरविल्यास खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या मंत्र्यांसाठी उपलब्ध असलेले बंगले, आमदार निवास, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवसस्थान मोजकेच आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग पाळणे चांगलेच अवघड होणार आहे. त्यामुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घ्यावे असाही सूर लावला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com