बावनकुळेंच्या मुलाचा विवाह : अदानी, पवार, ठाकरे, फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती...

आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचे चिरंजीव संकेत यांचा विवाह आज सायंकाळी पुण्यातील बावधन परिसरातील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे राजेंद्र पवार यांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत पार पडला.
बावनकुळेंच्या मुलाचा विवाह : अदानी, पवार, ठाकरे, फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती...
Marriage of MLC Chandrashekhar Bawankule's SonSarkarnama

पुणे ः राज्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे (MLC Chandrashekhar Bawankule) यांचे चिरंजीव संकेत यांचा विवाह आज सायंकाळी पुण्यातील बावधन परिसरातील ऑक्सफोर्ड गोल्फ रिसॉर्ट येथे राजेंद्र पवार यांची मुलगी अनुष्का हिच्यासोबत पार पडला. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्रासह देशभरातील दिग्गजांनी हजेरी लावली.

सायंकाळी ७ वाजता सुरू झालेला हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील दिग्गज नेत्यांसह देशभरातील मान्यवरांनी उपस्थिती लावून वर-वधूस आशीर्वाद दिले. अनेक मान्यवर फक्त लग्नासाठी आज पुण्यात आले होते. विदर्भाच्या गडचिरोली ते बुलडाणा जिल्ह्यांतील नेते आणि सामाजिक संस्थांची लोकांनी परिसर गजबजला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी एकाच वेळी आले. सोबतच त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले.

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनीही वेळात वेळ काढून हजेरी लावली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत, देवनाथ पिठाचे जितेंद्रनाथ महाराज, जगविख्यात योगगुरू बाबा रामदेव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, (Raj Thackeray) बाळा नांदगावकर, कॉंग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत, भाजपचे आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी संकेत व अनुष्का यांना आशीर्वाद दिले.

Marriage of MLC Chandrashekhar Bawankule's Son
बावनकुळे कडाडले; म्हणाले, ‘महाविकास’च्या ओबीसी मंत्र्यांनी आता पदावर राहू नये...

रविवार दिनांक २९ मे रोजी सायंकाळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे निवासस्थान असलेल्या नागपूर नजीकच्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान परिसरात स्वागत सोहळा होणार आहे. या सोहळ्यालाही विदर्भासह, महाराष्ट्र आणि देशभरातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती बावनकुळे कुटुंबातील सदस्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in