Marki Coal Mine : अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे आमदारांना अपमानास्पदरित्या सोडावा लागला मंच !

MLA SanjeevReddi Bodkurwar : लोकसुनावणीमध्ये एक अप्रिय घटना घडली.
MLA Sanjeevreddi Bodkurwar
MLA Sanjeevreddi BodkurwarSarkarnama

Yavatmal District's Marki Coal Mine News : मे. यझदानी इंटरनॅशनल प्रा.लि. भुवनेश्‍वर ही खासगी कंपनी यवतमाळ जिल्ह्यातील आदीवासीबहुल झरी जामणी आणि वणी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मार्की-मांगली येथे कोळसा खाण सुरू करणार आहे. यासंदर्भातील लोकसुनावणी सोमवारी (ता. १५) घेण्यात आली. (An unpleasant incident took place in the public hearing)

या लोकसुनावणीमध्ये एक अप्रिय घटना घडली. मंचावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह वणी आणि पांढरकवड्याचे उपविभागीय अधिकारी होते. त्याचवेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हेदेखील मंचावर होते. ईआयए नोटिफिकेशननुसार लोकसुनावणीमध्ये लोकप्रतिनिधींनी जनतेमध्ये बसणे अपेक्षित आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत मंचावर असल्यास सुनावणीवर त्याचा प्रभाव पडू शकतो. म्हणून कायद्याचे उल्लंघन होऊ नये, अशी मागणी समाजसेवक वासुदेव विधाते यांनी केली.

विधाते यांच्या आक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांना दखल घ्यावी लागली आणि आमदार बोदकुरवार यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता स्वतःहून खाली उतरणे पसंत केले. ते लगेच खाली उतरले आणि जनतेमध्ये जाऊन बसले. उपस्थित लोकांनी त्यांच्या या समजूतदारपणाचे तोंडभरून कौतुक केले. पण येथे प्रश्‍न असा उपस्थित होतो की, कायद्याचे ज्ञान प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाही का? किंवा लोकसुनावणीचे नियोजन करत असताना अधिकारी झोपा काढत होता का, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

लोकसुनावणीमध्ये लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या पॅनलमध्ये असू नये, त्याने प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बसू नये, हा साधा नियम जिल्हाधिकारी आणि एक नव्हे तर दोन-दोन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना माहिती असू नये, याचे आश्‍चर्य वाटते. वासुदेव विधातेंसारखा एक समाजसेवक कायद्याच्या प्रति जागरूक असू शकतो, तर मग वरिष्ठ अधिकारी कसे काय अनभिज्ञ असू शकतात, हा प्रश्‍न या प्रकारानंतर चवीने चर्चिला जात आहे.

MLA Sanjeevreddi Bodkurwar
Yavatmal APMC Results : यवतमाळ जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांचा उठला ‘बाजार’ !

ही जनसुनावणी तालुका प्रशासनाने आयोजित केली होती. तालुका अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे आमदारांना (MLA) आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही (Collector) मान खाली खालावी लागली. वास्तविकतः निवासी उपजिल्हाधिकारी अशी सुनावणी घेत असतात. पण यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याला सद्यःस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी नसल्यामुळे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी ही लोकसुनावणी घेतली. त्यामध्येही असा गोंधळ उडाला. हा परिसर बफर झोनमध्ये येतो. आधीच दोन कोळसा खाणी आणि आरसीपीआयएल या कंपनीचे काम येथे सुरू आहे आणि त्यातच आणखी एक खाण होणार, म्हणून नागरिक कमालिचे भडकलेले आहेत.

Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com