Maratha Aarakshan Andolan : यवतमाळ जिल्ह्यातही मराठा आक्रमक, काढली सरकारची प्रेतयात्रा !

Police : पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला.
Maratha Andolan at Mahagaon
Maratha Andolan at MahagaonSarkarnama

Yavatmal District Maratha Andolan News : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणाबाजीमुळे महागाव शहर दणाणून गेले होते. (The police administration lathi-charged)

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावात उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील महिला, पुरुष, वयोवृद्ध नागरिकांनी पाठिंबा देत मार्गाने शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केले असताना पोलीस प्रशासनाने लाठीचार्ज केला. त्यामध्ये महिला, शाळकरी विद्यार्थी, नागरिक गंभीर जखमी झाले. त्याबद्दल समाजामध्ये तीव्र संताप उमटला.

राज्यभर मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक होत आहे. महागाव तालुक्यातील मराठा समाजाच्यावतीने शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध करीत प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. ही प्रेतयात्रा गोपिका भरवाडे लेआऊटमधुन सुरू झाली आणि मार्गक्रमण करीत छत्रपती शिवराय चौकात पोहोचली. तेथे साहेबराव पाटील, तेजस नरवाडे, प्रमोद भरवाडे, प्रवीण ठाकरे, गोविंद देशमुख, संदीप ठाकरे, प्रमोद जाधव यांनी शासनाच्या मराठा समाजाप्रति उदासीन धोरणाचा निषेध केला.

प्रेतयात्रा तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर पोलीस प्रशासनाने आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध करीत प्रचंड घोषणाबाजी करीत प्रेतयात्रा मोर्चा पोलीस स्टेशनवर नेला. यानंतर आंदोलकांनी जालन्यातील मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठी चार्जचा निषेध करून मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या, या मागणीचे निवेदन दिले.

Maratha Andolan at Mahagaon
Yavatmal Congress News : शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचली कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा !

महागाव उमरखेड तालुक्याचा त्या अध्यादेशात समावेश करा..

शासनाने हैद्राबाद संस्थानच्या पूर्वीच्या असलेल्या कुणबी मराठा नोंदी लक्षात घेऊन मराठवाड्यातील (Marathwada) मराठा समाज बांधवांना कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यामध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचा (Collector) सदस्य म्हणून समावेश केला. परंतु यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील महागाव व उमरखेड हे दोन तालुके तत्कालीन हैद्राबाद संस्थानामध्ये समाविष्ट होते.

दोन्ही तालुके निजाम राजवटीच्या आधिपत्याखाली होते. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील मराठा समाजाच्या जातीच्या पूर्व नोंदीसुद्धा मराठा कुणबी असल्याने मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी काढलेल्या अध्यादेशात यवतमाळ जिल्ह्यातील महागाव व उमरखेड तालुक्याचा समावेश करा, या मागणीसाठी मराठा समाज आज रस्त्यावर उतरला.

Maratha Andolan at Mahagaon
Yavatmal BJP News: ‘आऊटगोइंग’ माहीत नसलेल्या भाजपचा गटनेताच लावला गळाला, अन...

म्हणून पोलीस स्टेशनवर नेली प्रेतयात्रा..

प्रेतयात्रा महागाव शहरातील भरवाडे लेआऊटमधून सुरू होऊन बस स्टँड चौक, तहसील कार्यालय, जुने बस स्थानक मार्गे मार्गक्रमण करून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात पोहोचून तिथे सांगता होणार होती. परंतु पोलीस प्रशासनाने ही प्रेतयात्रा तहसील कार्यालयासमोर अडवून तेजस नरवाडे, प्रमोद भरवाडे, शैलेश कोपरकर, संदीप ठाकरे, प्रवीण ठाकरे, गोविद देशमुख, ओम देशमुख, राजू धोतरकर यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केल्याने इतर आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी ही प्रेतयात्रा महागाव पोलीस स्टेशनवर नेली.

विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा..

मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी फार जुनी आहे. शासन फक्त वारंवार समाजाची दिशाभूल करीत असल्याने आता सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता समाजाच्या मागण्या त्वरित मान्य करून समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, अशी मागणी करून मराठा समाजाच्या मागणीला तालुक्यातील भिमराव भालेराव, महेंद्र कावळे, सुदाम खंदारे, रवींद्र भारती, शिवानंद राठोड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in