Maratha Aarakshan Andolan : उद्यापासून रस्त्यावर उतरणार कुणबी समाज, काॅंग्रेस-भाजपचे आजी-माजी आमदार आले सोबत !

OBC Movement : संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Anil Deshmukh and Others
Anil Deshmukh and OthersSarkarnama

Nagpur Kunbi OBC Political News : मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी पुढे आली. याला कुणबी समाज आणि एकंदरीतच ओबीसी संघटनांचा विरोध आहे. यासाठी उद्यापासून रस्त्यावर उरतण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (It was decided to protest at Constitution Square)

सर्व शाखीय कुणबी संघटना आणि ओबीसी संघटनांची काल (ता. आठ) संयुक्त बैठक नागपुरात झाली. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास तीव्र विरोध दर्शवण्याकरिता रविवारपासून (ता. १०) संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीत भाजप आणि काँग्रेसचे आजी-माजी आमदारही सहभागी झाले होते.

शुक्रवारी येथील समाज भवनात झालेल्या बैठकीत अ. भा. कुणबी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे, तिरळे कुणबी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश गुडधे पाटील, जगतगुरू तुकाराम महाराज सेवा समितीचे विदर्भाचे अध्यक्ष राजेश काकडे, प्रल्हाद पटोले, बाळा शिंगणे तसेच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख.

माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार, (Sunil Kedar) माजी राज्यमंत्री परिणय फुके, (Parinay Fuke) भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे, ग्रामीण भाजपचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, माजी आमदार अशोक धवड, दीनानाथ पडोळे, अ. भा. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Anil Deshmukh and Others
OBC Reservation News : एकूण आरक्षण ५० टक्के राहिलेच कुठे, ते आता ६० टक्के झाले !

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आंदोलकांवर लाठीमार केल्याने राज्य शासनाने एक पाऊल मागे घेऊन मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.

हैदराबाद संस्थानमध्ये ज्यांच्या नावापुढे मराठा-कुणबी असे दस्तावेज आढळल्यास त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासनादेश काढण्यात आला आहे. मात्र, जरांगे यांनी यावर हरकत घेतली असून, सरसकट मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे.

Anil Deshmukh and Others
National OBC Federation News : ...तर मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास आमची कुठलीही हरकत राहणार नाही !

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध आहे. याकरिता सर्व कुणबी आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांनी एकत्र येऊन यास विरोध दर्शवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत रविवारपासून संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हा व विधानसभा मतदारसंघनिहाय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठ्यांना सरसकट कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसींची लोकसंख्या ५२ टक्के असल्याने तेवढे आरक्षण द्यावे आणि जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली जाणार आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in