Sanjay Rathod : ठाकरेंच्या व्यूव्हरचनेवर राठोडांचा मास्टरस्ट्रोक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन् हजारोंचा जनसमुदाय

Eknath Shinde News : पोहरादेवी येथे मंत्री संजय राठोड यांचे शक्तीप्रदर्शन
Eknath Shinde, Sanjay Rathod, Uddhav Thackeray News
Eknath Shinde, Sanjay Rathod, Uddhav Thackeray NewsSarkarnama

Eknath Shinde News : पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अनावरण आणि सेवाध्वज स्थापना कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पोहरादेवी येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बंजारा समाजासाठी अनेक घोषणा केल्या. या माध्यमातून मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मास्टर स्ट्रोक मारला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

संजय राठोड यांना पुजा चव्हाण प्रकरणात मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिवसेनेमध्ये फुट पडली आणि शिंदे सरकार स्थापन झाले. या बंडामध्ये चव्हाण यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना साथ दिली. त्यानंतर त्यांना पुन्हा राज्यात मंत्रीपदाची संधी मिळाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राठोड यांना घेरण्यासाठी पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांना शिवसेनेत घेतले.

Eknath Shinde, Sanjay Rathod, Uddhav Thackeray News
Kasba by-election : कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय'; बापटांचे मुख्यमंत्री शिंदेंना आश्वासन

सुनील महाराज यांच्या माध्यातून राठोड यांना शह देण्याचा प्रयत्न केला. तसेच राठोड यांच्या मतदार संघातील माजी आमदार संजय देशमुख यांना शिवसेनेत प्रवेश देत राठोड यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. मात्र, ठाकरे यांच्या या रणनितीला राठोड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भरीव निधी पोरादेवी येथे दिला आहे.

यावेळी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे १३५ फूट उंच सेवाध्वज स्थापना, संत श्री सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळा अनावरण व ५९३ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर शिंदे यांनी आपल्या भाषणा दरम्यान, मोठ्या घोषणा बंजारा समाजासाठी केल्या.

Eknath Shinde, Sanjay Rathod, Uddhav Thackeray News
Sanjay Rathod : दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिला, पण बंजारा समाजामुळेच पुन्हा मंत्री : राठोडांची प्रतिक्रिया!

नवी मुंबई येथे बंजारा समाजाचे बोर्ड स्थापन करणार आहे. त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी बंजारा समाजाला देण्याची घोषणा शिंदे यांनी केली. बंजारा समाजातील मुलांना यापुढे शिक्षणापासून वंचित राहू देणार नाही. पोहरादेवी जिल्हा वाशीम येथे सेवा ध्वजारोहण तसेच रोहन व नंगारा वास्तुचे ५९३ कोटीचे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मुंबईत बंजारा समाज भवन उभे करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com