फडणवीस सरकारचा 'हा' निर्णय महाविकास आघाडी सरकारने फिरविला..
Devendra Fadanis and Uddhav ThackeraySarkarnama

फडणवीस सरकारचा 'हा' निर्णय महाविकास आघाडी सरकारने फिरविला..

फडणवीस Devendra Fadanvis यांच्या काळात हा निकष बदलून दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी एकसमान मदत देण्याचा निर्णय घेतला.

नागपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मागील सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा लावण्यात आला होता. त्यानंतर जुन्या सरकारचे निर्णय फिरविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. नुकताच कोरडवाहू आणि ओलित शेतजमीनीच्या नुकसान भरपाईबाबतचा फडणवीस सरकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने फिरवला.

महाविकास आघाडी सरकारने जुन्या फडणवीस काळातील निर्णय फिरवत नुकसानीच्या मदतीसाठी कोरडवाहू व ओलित शेत जमिनीचे निकष लागू केलेत. शिवाय मदतीच्या रकमेतही वाढ केल्याने ओलिताची (बागायती) नोंद असलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा होईल. सरकारने निकष बदलण्यासोबत ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांसाठी हे निकष तोट्याचे असल्याचे यापूर्वीही सांगण्यात आले होते.

पूर्वी शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी ओलित (बागायती) व कोरडवाहू (जिरायती) असा निकष होता. फडणवीस यांच्या काळात हा निकष बदलून दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी एकसमान मदत देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही प्रकारच्या शेतपिकांसाठी हेक्टरी १० हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत देण्याचे निश्चित केले होते. तर बहुवार्षिक पिकांसाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी १८ हजार दिले होते. २०१५ ला नुकसान दुष्काळ जाहीर करून भरपाईसाठी सरकारकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली होती. त्यावेळी कोरडवाहू जमिनीच्या शेतपिकांसाठी हेक्टरी ६ हजार ८ तर ओलित जमिनीच्या पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये मदत होती. परंतु २०१८ मध्ये तत्कालीन सरकारने या निकषात बदल केला.

Devendra Fadanis and Uddhav Thackeray
आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते : देवेंद्र फडणवीस

ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांकडे वीज किंवा डिझेल पंपाचा वापर होतो. त्यावर खर्च होत असल्याने त्याला ही मदत कमी होती. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारला याची जाणीव झाल्याने त्यांनी पुन्हा मदतीसाठी ओलित व कोरडवाहू प्रकार सुरू केला. जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर तर बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर २५ हजार रुपये २ हेक्टरच्या मर्यादेत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.