भाजपचा सत्तेचा माज उतरवण्यासाठी झाली होती महाविकास आघाडी...

त्यांना (BJP) सत्तेचा माज आला होता. तो माज उतरविण्यासाठीच महाविकास आघाडीची स्थापना झाली, असे राज्याचे मदत, पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज येथे म्हणाले.
भाजपचा सत्तेचा माज उतरवण्यासाठी झाली होती महाविकास आघाडी...
Vijay Wadettiwar at BhandaraSarkarnama

भंडारा : यापूर्वीच्या भाजप (BJP) सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला होता. त्यांना सत्तेचा माज आला होता. तो माज उतरविण्यासाठीच महाविकास आघाडीची स्थापना झाली, असे राज्याचे मदत, पुनर्वसन व ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज येथे म्हणाले.

भंडारा येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारासाठी आले असता, ते पत्रकारांशी संवाद साधत होते. कॉंग्रेसने शिवसेनेला अद्याप युपीएमध्ये स्थान दिलेले नाही, असे विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमची ही आघाडी फक्त महाराष्ट्रापुरती आहे. इतर राज्यात शिवसेनेसोबत जायचे किंवा नाही, याबाबतचा निर्णय हायकमांड घेतील. येणारी निवडणूक ठरवेल की, कुणाला किती जागा मिळतील. त्यानंतर पुढील सूत्र ठरेल. असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना खोचक टोला हाणला.

गोवा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केल्यानंतर संजय राऊत यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला होता. कॉंग्रेसला आत्मविश्‍वास नडणार असून तेथे त्यांच्या निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या एका अंकात असेल, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. त्या वक्तव्याचा विजय वडेट्टीवार यांनी आज येथे चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत यांच्या बोलण्याचा कॉंग्रेसवर किंवा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होत नाही, असेही ते म्हणाले. राउतांचे ‘निवडून येणाऱ्या आमदारांची संख्या एका अंकात’ हे विधान त्यांच्या स्वतःच्या पक्षासाठी आहे, असा पलटवारही वडेट्टीवार यांनी केला.

महाराष्ट्राच्या बाहेर कुण्या पक्षाशी युती नाही किंवा आघाडी नाही. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपले संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असतो, तो त्यांचा अधिकार आहे. युती करावी किंवा आघाडी करावी की नाही, हा निर्णय हायकमांडचा असतो. संजय राऊत जर म्हणत आहेत की गोव्यात आमचे आमदार एका अंकात राहतील, तर हे त्यांचे मत आहे. याबाबत आमचे मत वेगळे आहे. पण जनता कुणाला किती मते देणार, हे निवडणुकीच्या निकालानंतरच ठरणार आहे. राउतांच्या बोलण्याचा अर्थ त्यांच्या पक्षापुरता घ्यावा, त्याचा आमच्या पक्षाशी संबंध जोडू नये, असेही मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या विकासावर, महाविकास आघाडीवर राउतांच्या बोलण्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.

Vijay Wadettiwar at Bhandara
विजय वडेट्टीवार म्हणाले, आता १२ बलुतेदारांची मुलेही होतील डॉक्टर...

महाज्योतीच्या मार्फत स्वतःच्याच मतदारसंघात योजना नेत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचे आज वडेट्टीवार यांनी पुन्हा खंडन केले. पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत राज्यातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना करडईचे बियाणे देण्यात आलेले आहे. यातून जवळपास ५० क्लस्टर तयार करण्यात येणार आहेत. या ५० क्लस्टरमध्ये ५०० तरुणांना तरी रोजगार मिळेल, अशी ती योजना आहे. आज करडईच्या तेलाचे भाव चांगले आहेत आणि आरोग्यासाठीही हे तेल चांगले आहे आणि यातून रोजगार निर्माण होणार असतील, तर सर्वांनी महाज्योतीच्या योजनेचे स्वागत केले पाहिजे. पण विरोधक आपल्या स्वार्थासाठी विनाकारण विरोध करीत आहे, हा प्रकार त्यांनी थांबवावा, असे आवाहनही विजय वडेट्टीवार यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in