Mahavikas Aghadi News : वज्रमूठ सभा राजकारणाला नवी दिशा देणार, आघाडीच्या नेत्यांना विश्‍वास..

Nagpur Vajramooth Sabha: दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाची बैठक घेण्यात आली.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama

Meeting of South Nagpur Assembly : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसतर्फे विधानसभानिहाय बैठका घेतल्या जात आहेत. दर्शन कॉलनीच्या मैदानावर गर्दी जमवण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जात आहेत. काल सायंकाळी दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाची बैठक घेण्यात आली.

छत्रपती संभाजी नगर येथील वज्रमूठ सभा प्रचंड यशस्वी झाल्यानंतर येत्या रविवारी नागपुरात सभा होत आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करताना दिसत आहेत. मुख्यत्वे करून कॉंग्रेसवर या सभेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (This meeting has become a topic of discussion across the state)

त्यातल्या त्यात विजयाचे शिल्पकार मानले जाणारे माजी मंत्री आमदार सुनील केदार यांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या होम पीचवर होणारी ही सभा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. या सभेच्या यशस्वितेवर महाविकास आघाडीची पुढील वाटचाल ठरणार आहे.

सिद्धेश्वर सभागृहात झालेल्या बैठकीचे आयोजन माजी आमदार अशोक धवड यांनी केले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी होते. सभेचे संयोजक माजी मंत्री आमदार सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या सभेला नानांची अनुपस्थिती; कारण आले समोर...

भाजपच्या विरोधात होणारी आघाडीची वज्रमूठ सभा सर्वांसाठी महत्त्‍वाची अशी आहे. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीच्यादृष्टीने ही सभेचे दूरगामी परिणाम होणार आहेत, असे कॉंग्रेस नेते म्हणाले.

तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या सभेला अधिकाधिक नागरिकांना आणावे, असे आवाहन बैठकीत नेत्यांनी केले. भाजपच्या (BJP) कार्यकाळात महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. अंधश्रद्धा पसरविली जात आहे. निवडणूक (Election) जिंकण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याऐवजी भावनिक मुद्द्यांना प्राधान्य दिले जात आहे. यापासून प्रत्येक लोकांनी सावध राहिले पाहिजे. त्याकरिता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.

Mahavikas Aghadi
Congress News : मदतीतून फडणवीसांचा जिल्हा वगळला, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे आंदोलन...

सतीश चतुर्वेदी म्हणाले, केंद्र सरकारतर्फे लोकशाहीला धोका होईल, असेच निर्णय घेतल्या जात आहेत. यास रोख लावण्यासाठी वज्रमूठ सभा यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीला विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, शिवसेना (Shivsena) शहर प्रमुख दीपक कापसे, राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रदेश महासचिव शेखर सावरबांधे, दीनानाथ पडोळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

(Edited By : Atul Mehere)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com