Mahavikas Aghadiचं ठरलं, नाशिकमध्ये शुभांगी पाटील, तर नागपुरात अडबालेंना पाठिंबा...

Nagpur : नागपुरात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीचा पाठिंबा कुणाला, यासाठी गेल्या दोन-तीन दिवसांपासून खल सुरू होता. पण निर्णय होत नव्हता. आज मुंबई कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली आणि तिढा सोडवला.

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) नाशिकमध्ये (Nasik) अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आधीच पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांना आणि नागपुरात (Nagpur) विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदारसंघ आणि नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीतील गोंधळ मिटला आहे, असे म्हणता येईल.

माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांना काल पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये निवडणुकीत दोन गट सक्रिय राहतील का. असे विचारले असता, पक्षाचा निर्णय झाल्यानंतर आता कुणीही कुठे इतरत्र जाणार नाही. सर्व जण सोबत मिळून काम करतील. कारण पक्षाने भूमिका जाहीर केल्यावर वैयक्तिक कुणाचे काही राहात नाही. वाद संपतो आणि सगळे लोक एकसंघपणे काम करतात. तीन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघ अशा पाचही जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा विश्‍वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Nana Patole
BJPने शिंदे गटाला एकही जागा दिली नाही, ‘महाविकास’ म्हणून आम्ही पुढे जातोय...

जगातली सर्वात मोठी पार्टी असे स्वतःला म्हणवून घेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला नाशिकमध्ये शेवटपर्यंत उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे ते लोक आमची घरं फोडायला निघाले. पण त्यांचा हा डाव साध्य होणार नाही आणि आमचे पाचही उमेदवार निवडून येतील, असे वातावरण राज्यात तयार झाले आहे. नाशिक विभाग पूर्णतः कॉंग्रेसच्या विचारांचा आहे. त्यामुळेच सुधीर तांबे येथून तीन वेळा निवडून आले होते. आता आमचा पाठिंबा असलेल्या शुभांगी पाटील निश्‍चितपणे येथून निवडून येतील, असे नाना पटोले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com