Bhandara : आता पेटतोय महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावाद, भंडारा जिल्ह्यातील लोक होताहेत आक्रमक...

Borderism : मध्यप्रदेशातील लोक सीमांकनाचे उल्लंघन करून महाराष्ट्राची वाळू चोरून नेत आहेत.
Bhandara
BhandaraSarkarnama

Maharashtra Madhyapradesh Border Dispute : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटकची सीमावाद पेटला आहे. लाख भानगडी होऊनही हा वाद मिटण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीये. नागपुरात (Nagpur) सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही सीमा प्रश्‍नावर वातावरण तापले आहे. अशात नजीकच्या भंडारा (Bhandara) जिल्ह्यातही सीमावाद पेटला आहे.

हा वाद महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये (Madhyapradesh) सुरू आहे. वाळू घाट महाराष्ट्रात मात्र महसूल मिळतो मध्य प्रदेशात, अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे. मध्यप्रदेशातील लोक सीमांकनाचे उल्लंघन करून महाराष्ट्राची वाळू चोरून नेत आहेत. हा वाद जमिनीचा नसून दोन राज्याच्या मधून जाणाऱ्या बावनथडी नदीतील वाळू घाटाच्या संदर्भात आहे. दरम्यान मध्यप्रदेशातील लोक नदीत केलेल्या सीमांकनाचे उल्लंघन करून महाराष्ट्राची वाळू स्वतःचा हक्क दाखवत चोरून नेत असल्याने महाराष्ट्राचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे. वाळूघाट महाराष्ट्रात असूनसुद्धा त्याच्या महसूल मध्यप्रदेशा सरकारला मिळतो. याबाबत वेळोवेळी महाराष्ट्रातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करूनसुद्धा मध्यप्रदेशातील वाळू तस्कर आपला हक्क दाखवत वाळू चोरून नेत आहेत. यातून निर्माण झालेला वाद भविष्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील सीमावाद ठरणार आहे.

भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तुमसर तालुक्यातील बपेरा गावाजवळ असलेल्या बावनथडी नदीने महाराष्ट्र आणी मध्यप्रदेशची नैसर्गिक सीमा आखली गेली आहे. वैनगंगा नदीप्रमाणे बावनथडीची ही वाळू उत्तम असल्याने विदर्भात त्याची मागणी आहे. मात्र पर्यावरणाचे कारण समोर करत महाराष्ट्रातील पर्यायाने भंडारा जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाही. मात्र महाराष्ट्राच्या सीमेपलीकडे असलेल्या बपेरा गावाजवळील मध्यप्रदेश राज्यात वाळू घाटांचे लिलाव झाले असल्याने नदीतून वाळूची वाहतूक सुरू आहे. कालांतराने मध्यप्रदेश सीमेकडील वाळू संपल्याने वाळू तस्करांनी आपला मोर्चा महाराष्ट्राच्या सीमेवरील वाळू घाटावर वळविला असल्याने मध्यप्रदेशचे तस्कर महाराष्ट्रातील वाळू वर स्वत: हक्क दाखवत चोरून नेऊ लागले आहे.

वाळूघाट महाराष्ट्रात असूनसुद्धा त्याच्या महसूल मध्य प्रदेशात सरकारला मिळतोय आहे. महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील वारपिंडकेपार- सोंडया व बपेरा गावात हा वाळू चोरीचा प्रकार सर्रास सुरू असल्याचे दृश्य पहायला मिळत आहे. एकीकडे महाराष्ट्रात पर्यावरणाचे कारण पुढे करून वाळू घाटातून वाळू काढण्यास मनाई आहे. त्याचा परिणाम म्हणून घरकुलासह अनेक विकास कामे थांबली आहेत. मात्र भंडारा जिल्ह्याच्या पर्यायाने महाराष्ट्राच्या हक्काची वाळू मध्यप्रदेशात चोरून नेली जात असल्याने आता जिल्हावासी संतप्त झाले असून मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून यांचे सीमाकन झाले आहे. महाराष्ट्र सरकारने लाल झेंडे लावून नदीत सिमाकन सुद्धा केले आहे. दुसरीकडे वेळोवेळी महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी मध्यप्रदेशातील वाळू तस्करांवर कारवाईचा बडगासुद्धा उगारत आहेत. मध्यप्रदेशातील वाळू तस्कर आपला हक्क दाखवत वाळू चोरून नेत असल्याने निर्माण होत असलेल्या वाद भविष्यात महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दरम्यान सीमावाद निर्माण करण्यास कारणीभूत ठरणार आहे, हे मात्र नक्की.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com