Maharashtra Politics: महाराष्ट्रातील उद्योगांपाठोपाठ घरकुलेही राज्याबाहेर जाणार, दानवेंनी व्यक्त केली भीती !

Ambadas Danve : विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच तापवला होता.
Ambadas Danve and Girish Mahajan
Ambadas Danve and Girish MahajanSarkarnama

Mumbai Legislative Council News : वेदांता फॉक्सकॉन आणि एअरबस हे दोन उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले तेव्हा देशभर चर्चा झाली होती. विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच तापवला होता. आता महाराष्ट्रातील मंजूर झालेली घरकुले राज्याबाहेर जाण्याची भीती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. (The opposition had heated up this issue)

याबाबत सभागृहाला माहिती देताना दानवे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेचे राज्याला जे उद्दिष्ट दिले, ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे १ लाख १६ हजार ९५५ घरकुले केंद्र सरकारने इतर राज्यांत पाठविल्याची माहिती आहे. ही माहिती खरी असेल तर राज्य सरकार (State Governent) काय पावलं उचलणार आणि जर का माहिती खोटी असेल तर उद्दिष्ट कसं पूर्ण करणार? संभाजीनगरमध्येसुद्धा घरकुलाची मोठी योजना सुरू आहे. पण त्यामध्येही मोठा गोंधळ उडाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमघ्ये प्रत्यक्षात सात हजार घरकुलांचे टेंडर आहे. पण वर्क ऑर्डर ४० हजार घरकुलांची आहे. एकाच आयपी अॅड्रेसवरून चार कंपन्यांनी टेंडर भरले. आजूबाजूच्या तालुक्यांतील घरकुलांचे काम याच आयपी अॅड्रेसवरून आले आहे. या प्रकरणी ईडीची चौकशी लागली आहे. ४० हजार घरांची योजना परत गेली तर याला जबाबदार कोण, असा सवाल करीत राज्य सरकार एसआयटी चौकशी करणार का, असा प्रश्‍न अंबादास दानवे यांनी केला.

बेघरांच्या बाबतीतला हा महत्वाचा प्रश्न आहे. रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास, यशवंतराव चव्हाण आदी योजना घरकुलांसाठी आहेत. २०२४पर्यंत सर्वांना हक्काची घरं द्यायची आहेत. अजूनही मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ९ लाख ९३ हजार १७७ घरकुलं पूर्ण झाली आहेत आणि २०५५ होण्याची बाकी राहिली आहेत.

Ambadas Danve and Girish Mahajan
Ambadas Danve News: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये नवीन ते काय, असं म्हणणाऱ्या सत्तारांनी राजीनामा द्यावा !

२७ डिसेंबर २०२२च्या केंद्र सरकारच्या (Central Government) पत्रात यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. जी २०५५ घरकुले मंजूर झालेली नाहीत. त्यामध्ये काही अडचणी आहेत. काही लोक सापडत नाहीत. काहींची कागदपत्रे अपूर्ण आहेत. अशा लोकांना आम्ही शोधत आहोत. ही घरं दुसऱ्या राज्यांमध्ये गेली असे अंबादास दानवे यांचे म्हणणे चुकीचे आहे, असे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी उत्तरात सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com