जानकरांनी भाजप नेत्यांना उघडे पाडले; आमच्या काळात कुठे झाले विलीनीकरण

त्या मुळे जनतेने हुशार झाले पाहिजे.
 Mahadev Jankar
Mahadev Jankar sarkarnama

बुलडाणा : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST strike) सुरु आहे. त्यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी लावून धरली आहे. मुंबईमध्ये आझाद मैदानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत (Sadabhaut Khot) यांच्या नेतृत्त्वात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एसटी संपावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच या मुद्यावर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाष्य केले. (Mahadev Jankar said on the strike of ST in the state)

 Mahadev Jankar
फडणवीसांच्या `एसटी` विलीनीकरणाच्या `न्यूट्रल गिअर`ने पडळकर, सदाभाऊंचे हसे होणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या भेटीसाठी महादेव जानकर बुलडाण्यामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, आमचे सरकार होते तेव्हाही हा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे झाले विलीनीकर, असे सांगत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. रस्त्यावर असताना एक बोलायचे आणि आत गेल्यावर एक असते, त्यामुळे हा सिस्टीमचा भाग आहे. त्यामुळे जनतेने हुशार झाले पाहिजे, हाच एक त्यावरचा पर्याय आहे, असेही जाणकर म्हणाले.

 Mahadev Jankar
एसटी संपाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; विलीनीकरणावर मांडली रोखठोक भूमिका

बुलडाण्यात रविकांत तुपकर यांचे आंदोलन झाल्यानंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महादेव जानकर आले होते. तुपकर हे माझे चांगले मित्र असून त्यांना भेटण्यासाठी आलो असल्याचे जानकर यांनी सांगितले. जानकर यांनी तुपकर यांची शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com