असंसदीय शब्दांची यादी दिली, पण पण अंमलबजावणी करणार नाहीत !

त्यांचे आदेश नेमके काय आहेत, हे उद्या दिल्लीत गेल्यावर बघितले जातील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज येथे म्हणाले.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

नागपूर : १८ जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये असंसदीय शब्द वाढवण्यात आले आहेत. त्याची यादी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तयार केली आहे. पण त्यांचे स्टेटमेंट मी आज वर्तमान पत्रांत वाचले. यावर अंमलबजावणी करणार नाही, असे अध्यक्षांनी म्हटले आहे. त्यांचे आदेश नेमके काय आहेत, हे उद्या दिल्लीत (Delhi) गेल्यावर बघितले जातील, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज येथे म्हणाले.

आज सकाळी ११ वाजता येथील विमानतळावर (Nagpur Airport) पवार यांचे आगमन झाले. तेथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते हॉटेल रेडिसन ब्लूकडे रवाना झाले. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार सुबोध मोहिते, (Subodh Mohite) माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे, प्रशांत पवार आदी होते. आज पवार यांचा नागपुरात (Nagpur) मुक्काम असून उद्या ते रवाना होणार आहेत. आज येथे विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

एकनाथ शिंदे सरकारने औरंगाबादचे नामकरण संभाजी नगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. याबाबत विचारले असता, शहरांच्या नामांतराबाबतचा प्रश्न राज्य सरकारलाच विचारायला हवा, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी असंसदीय शब्दांची यादी तयार केली आहे पण त्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात त्यांचे विधान वाचले आहे पण नेमके आदेश काय आहेत. ते बघितले जातील आणि त्यावर सर्वपक्षीय नेते विचार विमर्श करतील आणि त्यानंतर प्रतिक्रिया देण्यात येईल, असेही ते म्हणाले. खासदारांना संसद भवनात धारणे, प्रदर्शन करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयावर दिल्लीत आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्र बसून विचार करू, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. सोबतच असंविधानिक शब्दांची नवी यादी बनवण्यात आली आहे त्यावरसुद्धा काय करायचे, ते आम्ही बघू असही ते म्हणाले.

Sharad Pawar
औरंगाबादच्या नामांतरावरून शरद पवार नाराज; थेट उद्धव ठाकरेंकडं दाखवलं बोट

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर आज प्रथमच पवार नागपुरात आले. नागपुरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. सायंकाळी ५ वाजता डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात डॉ. सी.डी. मायी कृषी तज्ज्ञ पुरस्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती राहणार आहे. याशिवाय माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, माजी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, वनराईचे गिरीष गांधी उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in