Eknath Shinde News: त्यावेळी ‘वर्षा’वर पाटीभर लिंबं सापडली होती : एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

प्रबोधनकरांचे वारसदार म्हणविणारे लिंबू फिरवण्याची लिंबू-टिंबूची भाषा करत आहेत. कुठं चाललो आहेात आपण?
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : मला आठवतंय. आम्ही वर्षा (Varsha) निवासस्थानी फार उशिरा गेलो. त्या ठिकाणी काय आहे ते बघा, असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी ‘वर्षा’वर पाटीभर लिंबं सापडली. सगळं होतं, त्याच्यामध्ये. लिंबू-टिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांबरोबरच प्रबोधनकारांच्या विचारालाही तिलांजली दिली आहे, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला. (Lemon's were found on 'Varsha' that time : Eknath Shinde's secret explosion)

पुरवणी मागण्यावंरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रतिहल्ला केला. या वेळी शिंदे म्हणाले की, तुम्ही दुसऱ्यावर टीका करताना आत्मचिंतन करा. सत्याला सामोरे जा. या सर्व प्रकरणात चूक कोणाची आहे, हे एकदा स्वतःला विचारा. मी कधीही कोणावरही पातळी सोडून बोलणारा कार्यकर्ता नाही.

Eknath Shinde
Assembly Session : आम्ही रेशीम बागेत गेलो; गोविंद बागेत नाही गेलो : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

एखादा-दुसरा माणूस चुकू शकतो. पण, ५० लोक कशी काय चुकू शकतात. आमच्या सरकारचं नागपुरातील हे पहिलंच अधिवेशन आहे. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी नागपूर शहरातील श्रद्धास्थळाला भेट दिली. त्यानंतर काही नेत्यांनी राजकारण करण्याची त्यातही संधी सोडली नाही. ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांड सातत्यावर प्रहार केला. अंधश्रद्धेच्या विरोधात सातत्याने लढले, त्याच प्रबोधनकरांचे वारसदार म्हणविणारे लिंबू फिरवण्याची लिंबू-टिंबूची भाषा करत आहेत. कुठं चाललो आहेात आपण, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी केला.

Eknath Shinde
Narwekar No-Confidence Motion : पवारांची सही असती तर बरं झालं असतं; पण, एका वर्षात अविश्वास... : विधीमंडळ माजी सचिवांचे मोठे भाष्य

या वेळी अजित पवार यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला. दादा, तुम्ही काल आमच्या लोकांना निर्लज्ज म्हणाला. पण आमच्या विरोधात सतत गरळ ओकणाऱ्या लोकांविरोधात बोलण्याची हिम्मतही तुम्ही दाखवायला हवी. तुम्ही आमचे ५० वर्षांपूर्वीचे काढताय. या लोकांनी अनेक पाप केले आहे. त्यांच्या विरोधात तुम्ही बोलत नाही, असेही शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in