लिलाताई चितळे म्हणाल्या संविधान धोक्यात; तर शरद बोबडे म्हणाले, धोका नाही..

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, (Sharad Babde) ख्यातनाम विधितज्ज्ञ हरीश साळवे आणि ज्येष्ठ समाजसेविका लिलाताई चितळे यांचा नागभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री बोबडे बोलत होते.
Sharad Bobde
Sharad BobdeSarkarnama

नागपूर : देशात सध्या सुरू असलेले राजकारण पाहता कोणालाही अस्वस्थ व असुरक्षित वाटू शकते. पण, काळजी करण्याचे कारण नाही. देशाचे संविधान एकदम सुरक्षित आहे अशी निःसंदिग्ध ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी दिली.

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे, (Sharad Babde) ख्यातनाम विधितज्ज्ञ हरीश साळवे आणि ज्येष्ठ समाजसेविका लिलाताई चितळे यांचा नागभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री बोबडे बोलत होते. वर्धा (Wardha) रोडवरील एका हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर होते. या कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ समाजसेविका लिलाताई चितळे यांनी देशाचे संविधान धोक्यात असल्याची वेदना व्यक्त केली. न्यायमूर्तींनी (Justice) संविधानाचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. संविधान सुरक्षित राहिले तरच महात्मा गांधींनी (Mahatma Gandhi) पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती होईल असे त्या म्हणाल्या. त्यावर संविधानाला धोका नाही, असे श्री बोबडे यांनी सांगितले.

लिलाताई चितळे यांना आश्वस्त करताना शरद बोबडे यांनी संविधानाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. न्यायालये संविधानाचे संरक्षक आणि पालक म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे संविधान सुरक्षित आहे, असे बोबडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनीही संविधान यापूर्वीही सुरक्षित होते, आताही सुरक्षित आहे आणि यापुढेही सुरक्षित राहील, अशी खात्री दिली. यावेळी बोलताना सिरपूरकर यांनी तीनही सत्कारमूर्तींशी असलेले कौटुंबिक संबंध आणि आठवणींना उजाळा दिला.

Sharad Bobde
गतिमान न्यायासोबत गुणवत्तापूर्ण न्यायही महत्वाचाच - सरन्यायधीश शरद बोबडे 

लहानपणी हेलिकॉप्ट​​​रचा हट्ट..

सत्काराला उत्तर देताना हरीश साळवे यांनी लहानपणी हेलिकॉप्टर मागण्यासाठी आईसोबत करीत असलेली खेळी पुढे न्यायालयात युक्तिवाद करताना कामी आल्याचे सांगितले. लहानपणी मला हेलिकॉप्टरचे खेळणे हवे असायचे. माझी आई डॉक्टर होती. मी तिच्याकडे रुग्ण असल्याची नेमकी वेळ पाहून हेलिकॉप्टरचा हट्ट करीत असे. तिच्याकडे रुग्ण असल्यामुळे आई फार विरोध करू शकणार नाही, हे मला माहिती होते आणि व्हायचेही तसेच. हे टायमिंग तेव्हापासून माझ्या कामी येते, असे साळवे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुजरात निवडणूक प्रचारामुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in