खड्डे बुजवता, की आंदोलन करू; गोंडपिपरीतील शिवसैनिक संतापले...

बाजारपेठ अडचणीत आली आहे. त्यामुळे खड्डे बुजवता की आंदोलन करू, अशी विचारणा शिवसैनिकांनी आमदारांना केली आहे. MLA Subhash Dhote
खड्डे बुजवता, की आंदोलन करू; गोंडपिपरीतील शिवसैनिक संतापले...
Shivsainik of Gondpipari.Sarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : राजुऱ्याचे कॉंग्रेसचे आमदार सुभाष धोटे गोंडपिपरीला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप नेहमीच होत आला आहे. खेडी, धाबा व अनेक मार्गांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. या खड्यांनी अनेकांचे जीव घेतले. आता तर व्यापारी या मार्गावरून वाहन पाठविण्यास तयार नाहीत. बाजारपेठ अडचणीत आली आहे. त्यामुळे खड्डे बुजवता की आंदोलन करू, अशी विचारणा शिवसैनिकांनी आमदारांना केली आहे.

लोकांना होत असलेला त्रास, व्यापारपेठेवर होणारा परिणाम लक्षात घेता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मार्गाचे डांबरीकरण करायला लावा, नाहीतर किमान खड्डे तरी बुजवायला सांगा. जेणेकरून लोकांचे जीव जाणार नाही, अशी मागणी करीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासह आमदार सुभाष धोटे यांच्यावर निशाणा साधत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील मार्गावरील गिट्टी टाकली आणि आपला रोष व्यक्त केला.

गोंडपिपरी खेडी मार्ग हा तसा तर वर्दळीचा. पण हल्ली या मार्गावरून वाहतूक मंदावली आहे. तेलंगणा राज्याला जोडणारा धाबा मार्ग जीवघेणा ठरला आहे. गोंडपिपरी पोंभुर्णा बायपास मार्गावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. तालुक्याच्या विकासात हातभार लावणाऱ्या या रस्त्याच्या दुर्दशेने लोक त्रस्त झाले आहेत. अपघातांत अनेकांचा जीवही गेला. काही जखमी होऊन घरी पडून आहेत. वाहतूक कमी झाल्याने व्यापारपेठेवर मोठा परिणाम झालेला आहे. या महत्वाच्या मागणीकडे लक्ष देण्याचे सोडून तालुका प्रशासन वाळू तस्करांना अभय देत आहेत. यामध्ये अनेक कार्यकर्ते या कामात गुंतले असल्याचाही आरोप शिवसैनिकांनी केला.

गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाच्या बाता करणाऱ्या आमदार सुभाष धोटे यांचे याकडे पुरते दुर्लक्ष आहे. विकासकामाच्या नावावर आपल्या जिवलग सहकाऱ्यांना गोंडपिपरीत भेट द्यायला ते येतात, असाही आरोप आरोप होतो आहे. गोंडपिपरी तालुक्यातील या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. काल गोंडपिपरीच्या अनेक प्रमुख मार्गांवरील खड्ड्य़ांतील गिट्टी जमा करून ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर शिवसैनिकांनी आणून टाकली. एकतर तातडीने मार्गाचे डांबरीकरण करावे अथवा खड्डे बुजवून थोडाफार दिलासा तरी द्यावा, अशी मागणी आहे. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत शिवसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडूरवार, विवेक राणा, तुकाराम सातपुते, नबात सोनटक्के, शुभम भोयर, प्रवीण सोनटक्के, राहुल मेकर्तीवार, जितेंद्र लोडे, मंगेश गेडाम, मंगेश चंद्रगिरीवार यांची उपस्थिती होती.

Shivsainik of Gondpipari.
भाजपचे १८ जण शिवसेना प्रवेशास उत्सुक; नगरसेवक संगमनेरे राऊतांच्या स्वागताला

महाराष्ट्र तेलंगणाला जोडणाऱ्या आणि गोंडपिपरी खेडी या प्रमुख मार्गाची अवस्था अतिशय खराब आहे. लोकांना आपले जीव गमवावे लागत आहेत. व्यापारपेठेवर याचा बराच परिणाम झाला आहे. प्रशासनाने याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे व मार्गाची किमान दुरुस्ती तरी करावी.

जितेश वेगीनवार, व्यावसायिक गोंडपिपरी.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.