Nana Patole : दावोसवरून काय आणले ते जाऊ द्या, आधी गुजरातला गेलेल्या उद्योगांचं काय ते बोला !

Eknath Shinde : नुसत्या घोषणांना काही अर्थ नाही. शेवटी काय की, ते खोकेवाले लोक आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Chief Minister's visit to Davos : मुख्यमंत्री दावोसला गेले आणि तेथून महाराष्ट्रासाठी १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचा दावा केला जात आहे. पण आधी जे उद्योग गुजरातला पाठवले, त्याबाबतीत चर्चा झाली पाहिजे. गुजरातला पळवून नेलेल्या उद्योगांबाबत काय ते बोला, असा टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मुख्यमंत्र्यांना लगावला.

मुंबई (Mumbai) येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, दावोसला अनेक लोक गेले, घोषणाही झाल्या. पण आतापर्यंत किती उद्योग महाराष्ट्रात (Maharastra) आले, त्याचा हिशेब आपण घेतला तर लक्षात येते तो शून्य आहे. त्यामुळे नुसत्या घोषणांना काही अर्थ नाही. शेवटी काय की, ते खोकेवाले लोक आहे. त्यामुळे घोषणा करायला काय जाते. खोक्यांच्या घोषणा ते करतीलच. पण प्रत्यक्षात महाराष्ट्राला काय मिळते, हे शोधले पाहिजे.

जी-२०च्या वेळी मुंबईला सजवण्याचे जे काम झाले होते, त्यावेळी विमानतळाच्या मार्गावर दोन्ही बाजूंना मोठमोठी फलकं लावण्यात आली होती. घाण दिसू नये म्हणून कापडं लावून झाकण्यात आले होते. कपड्यांच्या पडद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठमोठे फोटो लावून ठेवले होते. काही दिवसांपूर्वी मुंबईचे हे दर्शन आपल्याला झाले होते. आता पुन्हा मोदींचा मुंबई दौरा आहे. उद्या ते येत आहेत. यावेळी काय काय बघायला मिळते, हे पहावं लागेल, असे नाना पटोले मोदींच्या दौऱ्याबाबत म्हणाले.

Nana Patole
Ashish Deshmukh: कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीवर डाॅ. आशिष देशमुख यांचा आक्षेप

विकास कामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी फिरत असतात. नाल्यांचे, गटारांचे भूमिपूजन पंतप्रधान करतात. याचं काही कळत नाही. गटारांचे भूमिपूजन करणे, ही त्यांच्यासाठी ती मोठी काम असतीलही. पण पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसून मोदी निवडणुकांचा प्रचारच जास्त करतात. उद्याचा त्यांचा दौरा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच आहे, असे म्हणायला पूर्ण वाव आहे. महाराष्ट्रातील भाजपवाले महापालिका निवडणुकीसाठी पंतप्रधानांना प्रचारक म्हणून आणत असतील, तर हे त्यांचे अपयश आहे. अशी टिका नाना पटोले यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com