Wadettiwar : कुणालाही काहीही टिका करू द्या, पण ‘भारत जोडो’ ही माणूस जोडणारी यात्रा !

विरोधक सोडले तर आज प्रत्येकाला वाटत आहे की, याच मार्गाने हा देश पुढे जावा. म्हणूनच भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे, असे आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Vijay Wadettiwar नागपूर : भारत जोडो यात्रेचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र उत्सुक आहे. राज्यातील जनतेमध्ये जोम आणि उत्साह संचारला आहे. आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास देगलूर येथे सीमेवर महाराष्ट्रात यात्रेचं आगमन होणार आहे. लाखो लोक स्वतःहून यात्रेच्या स्वागतासाठी तेथे पोहोचत आहेत. हजारो गाड्यांतून लोक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. भूतो न भविष्यति असं स्वागत राहुल गांधींच्या यात्रेचं महाराष्ट्रात होणार आहे, असे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार आज नागपुरात (Nagpur) ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

या यात्रेमध्ये कॉंग्रेस (Congress) म्हणून आम्ही फारशी भूमिका पार पाडत नाही आहोत. तर लोक स्वतःहून यात्रेत सहभागी होत आहेत. दुभंगलेली मने जोडणे, हा या यात्रेचा उद्देश आहे. धार्मिकतेची वाढलेली दरी बुजवायची आहे. आपसी मतभेदांमुळे देश अशांत होत चालला आहे. शांततेच्या पथावर जाऊन गांधीजींच्या (Mahatma Gandhi) मार्गाने या देशाला पुन्हा उभारी मिळावी, सर्वसमावेशक, सर्व धर्मांचा सन्मान करणारा, आदर करणारा, जात धर्मांच्या पलीकडे जाऊन एकसंघ भारत (India) निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत. विरोधक सोडले तर आज प्रत्येकाला वाटत आहे की, याच मार्गाने हा देश पुढे जावा. म्हणूनच भारत जोडो यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे, असे आमदार वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
Wadettiwar : ..तर ती आनंद भेट ठरली असती, असं का म्हणाले आमदार विजय वडेट्टीवार ?

या यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेसमधील सर्व नेते एकत्रित येतील का, असे विचारले असता, नेत्यांमधील मतभेद कोणत्या पक्षात नाहीत. सर्वच पक्षांमध्ये थोड्याफार फरकाने ते दिसतात. त्यांचे दिसत नाहीत, पण आमचे दिसतात. कारण आमच्याकडे दाखवणारेही आहेत, त्यामुळे दिसतात. आमच्यामध्ये वैयक्तिक मतभेद असतीलही, पण वैचारिक मतभेद नाहीत. आमचा विचार एक आहे आणि आम्ही सर्व एक आहोत. सर्व धर्म समभावाच्या विचाराला आम्ही एक आहो. टिका करणारे टीका करतात, त्यांना करू द्या. पण ही कॉंग्रेस जोडणारी यात्रा नाही, तर ही माणूस जोडणारी यात्रा आहे, असेही आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com